समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील
वाल्मीकि रामायणाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये उलगडणारी
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

scan_prayog
यू.टी. स्कॅनरद्वारे नोंद घेतांना

श्रीरामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे ७ कांडांत विभाजित केले आहे. समर्थ रामदासस्वामींनी वयाच्या १४ व्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील टाकळी येथे संस्कृत भाषेत वाल्मीकि रामायण लिहिण्यास आरंभ केला. या रामायणाची एकूण ७ कांडे आहेत. समर्थांनी लिखाणाचा आरंभ बालकांडाने केला. समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे, महाराष्ट्र येथे असलेल्या समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या वाल्मीकि रामायणाच्या प्रतीचे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परीक्षण करण्यात आले. यात समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील रामायणातील ७ कांडांचे स्वतंत्र आणि नंतर सर्व कांडे एकत्रित करून परीक्षण करण्यात आले, तसेच बालकांडातील साधारण पान आणि समर्थांनी लिहिलेल्या बालकांडातील मालामंत्राचे पान असे एकूण १० घटक वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील मालामंत्राच्या पृष्ठाचे छायाचित्र

Ramdas_swami_hastakshar

 

१. वैज्ञानिक चाचणीसाठी निवडलेल्या
समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील
वाल्मीकि रामायणातील विविध कांडांविषयीची माहिती

१ अ. बालकांड : यात श्रीरामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस, विश्‍वामित्रांनी राक्षसांच्या संहारासाठी वनात नेणे, सीतास्वयंवर आदी घटनांचा समावेश आहे.

१ आ. अयोध्याकांड : या भागात कैकयीने दशरथाद्वारे श्रीरामाला वनवासात धाडणे आणि दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होणे या घटनांचा समावेश आहे.

१ इ. अरण्यकांड : श्रीरामाचे वनवासातील जीवन, सीतेचे अपहरण या भागात चित्रित केले आहे.

१ ई. किष्किंधाकांड : सीतेच्या शोधातील श्रीरामाने किष्किंधेच्या वानर साम्राज्यात प्रविष्ट होणे, तेथे त्याची सुग्रीव, हनुमंत आदी कपिविरांची झालेली भेट, वानरसैन्याने सीतेस हुडकण्यास प्रारंभ करणे यांचे चित्रण केले आहे.

१ उ. सुंदरकांड : या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन येते. हनुमंताचे दुसरे एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदरकांड असे नाव आहे. हनुमानाने समुद्र लंघून लंकेत प्रवेश करणे, लंकादहन घडवणे, रावणाच्या राज्यातील अशोकवन येथील सीतेच्या उपस्थितीबद्दल श्रीरामाला कळवणे या घटनांचा समावेश आहे.

१ ऊ. युद्धकांड : यात श्रीराम आणि रावण यांचे युद्ध, रावणवध, त्यानंतर श्रीरामाचे सहपरिवार अयोध्येस पुनरागमन आणि श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.

१ ए. उत्तरकांड : यात श्रीरामाने लोकनिंदेमुळे सीतेचा केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, श्रीरामावतार समाप्ती यांचे वर्णन आहे.

१ ऐ. संपूर्ण रामायण : यात रामायणाची १ ते ७ सर्व कांडे एकत्रित ठेवली होती.

समर्थ रामदासस्वामींनी संस्कृत भाषेत लिहिलेले हे वाल्मीकि रामायण आजच्या संस्कृत व्याकरणकारांनी पडताळले. तेव्हा त्यांना त्यामध्ये व्याकरण, भाषाशुद्धी, वाक्यरचना इत्यादी कोणत्याही प्रकारच्या चुका किंवा त्रुटी आढळल्या नाहीत.

 

२. यू.टी.एस्. उपकरण

२ अ. उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

२ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

२ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

२ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

२ आ ३. उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र आदी.

 

३. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

 

४. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)
उपकरणाद्वारे जुलै २०१४ मध्ये केलेली निरीक्षणे

चाचणीतील सर्व घटकांतील इन्फ्रारेडआणि अल्ट्राव्हायोलेटया दोन्ही नकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरने केलेला कोन ० अंशाचा होता, तसेच त्यांची प्रभावळही आढळली नाही. त्यामुळे पुढील सारणीत त्यांचा उल्लेख केलेला नाही.

table_samartha

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

४ अ. निरीक्षणांचे सार

४ अ १. रामायणाच्या सर्वच कांडांमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे : सर्वच व्यक्ती, वस्तू अथवा वास्तु यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येत नाही. चाचणीतील सर्व घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही; पण सकारात्मक ऊर्जा आढळली.

४ अ २. रामायणाच्या सर्वच कांडांची प्रभावळ सामान्य व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत अधिक असणे : सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. रामायणातील सर्व कांडांमध्ये सर्वांत अल्प प्रभावळ सुंदरकांडाची आहे. ती २.८५ मीटर आहे, म्हणजे सामान्य व्यक्तीच्या प्रभावळीपेक्षा पुष्कळ अधिक आहे.

४ अ ३. बालकांडातील समर्थलिखित मालामंत्राच्या पानाची सकारात्मक ऊर्जा आणि प्रभावळ इतर घटकांच्या तुलनेत सर्वाधिक असणे : बालकांडातील समर्थलिखित मालामंत्राच्या पानाची सकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरने १५० अंशाचा कोन केला. हा कोन इतर परीक्षणातील इतर घटकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, तसेच या पानाची प्रभावळही सर्वाधिक म्हणजे ६.२६ मीटर आहे. ही प्रभावळ संपूर्ण रामायणाच्या (एकत्रित ठेवलेल्या सर्व कांडांच्या) प्रभावळीपेक्षाही (६.२५ मीटरपेक्षाही) किंचित अधिक आहे, तर बालकांडाच्या सर्वसाधारण पानाच्या प्रभावळीपेक्षा (२.९० मीटरपेक्षा) पुष्कळ अधिक आहे. यावरून केवळ मालामंत्राच्या पानातून प्रक्षेपित होणारी ऊर्जा ही सर्वाधिक असल्याचे लक्षात येते.

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.(१६.९.२०१४)

ई-मेल : [email protected]

 

एका संतांनी केलेले आध्यात्मिक स्तरावरील विश्‍लेषण

समर्थ रामदासस्वामींनी मालामंत्राच्या
पानात संपूर्ण रामायणाची शक्ती संपुटित करणे

समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्‍लोक लिहिले आणि त्याला कवच केले. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण रामायणातील शक्ती केवळ एका मालामंत्राच्या पानात संपुटित केली. शक्ती घनीभूत करणे, हे तेजतत्त्वाच्या स्तरावरील कार्य आहे. शक्ती संपुटित करणे, हे वायूतत्त्वाच्या स्तरावरील, म्हणजे त्यापेक्षाही उच्च स्तरावरील कार्य आहे. हे केवळ उच्च स्तरावरील संतच करू शकतात. – (पू.) सौ. अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा