प्रभु श्रीरामाशी संबंधित श्रीलंका आणि भारतातील विविध स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

रामायण हा भारताचा अमूल्य ठेवा आणि इतिहास आहे. आधुनिकांनी कितीही नावे ठेवली आणि त्यांचे अस्तित्व अमान्य करण्याचा प्रयत्न केला, तरीही रामायण काळातील विविध घटनांची ही छायाचित्रे या इतिहासाची साक्ष देतात. रामायणाचा काळ हा त्रेतायुगातील म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यातून हिंदु संस्कृतीची महानता, प्राचीनता यांचाही प्रत्यय येतो. येथे रामायण काळातील श्रीलंकेतील स्थाने विशेष करून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा सीतामातेच्या अपहरणानंतर तेथील वास्तव्याचा पुरावाच आहे.

सीतामातेने ज्या ठिकाणी अग्नीप्रवेश केला, त्या स्थानावरील अश्‍वत्थ वृक्ष आणि मंदिर. श्रीलंकेतील मध्य प्रांतातील अतीउंच पर्वतीय भागात हे स्थान आहे.
‘गुरुलूपोथा’ येथे रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या महालाच्या अवशेषांची छायाचित्रे ! सीतामातेचे रावणाने अपहरण करून तिला याच महालात ठेवले होते.
महाराणी मंदोदरीच्या महालाच्या दक्षिणेकडे असलेल्या या पायर्‍या उतरून सीतामाता तेथे असलेल्या नदीत आंघोळीसाठी जात असत !
‘सीतामातेच्या शोधात आलेल्या रामभक्त हनुमंताने या दगडावरून ज्या अशोक वृक्षाखाली सीतामाता बसली होती, त्या वृक्षावर झेप घेतली’, असे म्हणतात. दगडावर त्याचे पाऊल उमटले आहे.

 

शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी…

त्रेतायुगात श्रीरामाने त्याच्या प्रजेसह अयोध्येतील याच शरयू नदीत जलसमाधी घेतली होती, तर कलियुगात रामजन्मभूमी आंदोलनासाठी वर्ष १९९० मध्ये अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. नंतर कारसेवकांचे मृतदेह याच नदीत फेकले होते.

 

श्रीराम रामजन्मभूमीवर एका तंबूत !

भारताचा राजा, रावणाचा नाश करून श्रीलंका जिंकणारा अवतारी प्रभु श्रीरामाच्या अयोध्येतील सध्याच्या स्थानाची स्थिती ! गेली अनेक वर्षे श्रीराम याच तंबूत आहेत. श्रीरामाचा याहून मोठा अवमान काय असू शकतो ? हिंदु समाजाचे आराध्यदैवत अशाप्रकारे ऊन, वारा आणि पाऊस सहन करत आहे, हे हिंदु समाजाला लज्जास्पद नव्हे का ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment