प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे

Article also available in :

Ramsetu_Dagad

रामसेतूचा तरंगता दगड. हा ४ किलो वजनाचा आहे, तर बाजूला
असलेले त्याच्यापेक्षा कमी वजनाचा दगड पाण्यात बुडाले आहेत.

ram_naane

प्रभु श्रीरामाच्या काळातील नाणे

तमिळनाडू राज्याच्या पूर्वकिनार्‍यावर रामेश्‍वरम् हे तीर्थक्षेत्र आहे. रामेश्‍वरम्च्या दक्षिण बाजूस ११ कि.मी. अंतरावर धनुषकोडी हे नगर (शहर) आहे. रामसेतूच्या अलीकडील भागाला धनुषकोडी (कोडी म्हणजे धनुष्याचे टोक) असे म्हणतात; कारण साडेसतरा लाख वर्षांपूर्वी रावणाच्या लंकेत (श्रीलंकेत) प्रवेश करण्यासाठी श्रीरामाने त्याच्या कोदंड धनुष्याच्या टोकाने सेतू बांधण्यासाठी हे स्थान निश्‍चित केले. एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. या रामसेतूची रुंदी आणि लांबी यांचे प्रमाण एकास दहा आहे, असे सविस्तर वर्णन वाल्मीकि रामायणात आहे. प्रत्यक्ष मोजमापन केल्यानंतरही त्यांची रूंदी ३.५ कि.मी एवढी असून लांबी ३५ कि.मी एवढी आहे. या सेतूच्या निर्माणकार्याच्या वेळी चिमुकल्या खारीने उचललेल्या वाट्याची कथा आणि पाण्यावर तरंगत असणारे तेथील दगड या गोष्टी आम्हा हिंदूंच्या पिढ्यान्पिढ्यांना माहीत आहेत.