संत वेण्णास्वामी यांनी रामाविषयी लिहिलेला अभंग

संत वेण्णास्वामी

बंदविमोचन राम ।
माझा बंदविमोचन राम ॥ धृ ॥

सकळही ऋषिमुनी भजती जयासी ।
एकचि तो सुखधाम ॥१॥

सद्गुरुकृपा ओळखिला जो ।
कौसल्येचा राम ॥२॥

भावभक्तीच्या सुलभसाधनी ।
पुरवी सकळही काम ॥३॥

शरण ही वेणा आत्मारामा ।
पावली पूर्णविराम ॥४॥

(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

Leave a Comment