प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चित्रकूट पर्वताचे समग्र दर्शन

1350120702_shri-ram300

प्रभु श्रीरामचंद्र १४ वर्षांच्या वनवासानंतर रावणाचे पारिपत्य करून चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला अयोध्येला परत आले; म्हणून त्या दिवशी गुढ्या-तोरणे उभारून त्यांचे आनंदाने स्वागत केले होते. श्रीरामचंद्रांनी वालीच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. जे मुक्त झाले, त्यांनी त्या दिवशी गुढ्या (ध्वज) उभ्या केल्या. श्रीरामाने वालीचा, आसुरी प्रवृत्तींचा नाश केला, त्याचे हे सूचक ! भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे १४ वर्षांच्या वनवास काळात उत्तरप्रदेशमधील चित्रकूट पर्वतावर निवासाला होते. चित्रकूट पर्वतावरील गुप्त गोदावरी, श्री भरत-राम मिलाप मंदिर, श्रीरामचंद्रांनी वालीचा ज्या ठिकाणाहून वध केला, ते ठिकाण अशी दुर्मिळ छायाचित्रे रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर वाचकांसाठी देत आहोत.

chitrakut_1चित्रकूट येथील पर्णकुटी श्रीराम मंदिर. याठिकाणी
श्रीराम, सीता आणि लक्ष्मण ११ वर्षे कंदमुळे खाऊन राहिले होते.

chitrakut_2चित्रकूट येथील श्री भरत-राम मिलाप मंदिर.राम वनवासाला गेले
आहेत, हे समजल्यावर 
भरत रामाला भेटायला चित्रकूटला आले, हेच ते ठिकाण !

chitrakut_3श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या चरण पादुका

chitrakut_4चित्रकूट पर्वतावरील गुप्त गोदावरीचे उगमस्थान. श्रीरामाच्या दर्शनासाठी नाशिक
येथील गोदावरी देवी गुप्त रूपाने प्रकट झाल्यामुळे या ठिकाणाला गुप्त गोदावरी म्हणतात.

chitrakut_5किष्किंधा नगरी, हम्पी, कर्नाटक याठिकाणी श्रीरामाने वालीचा वध केला.

chitrakut_6चित्रकूट येथील भरत-राम भेटीच्या वेळीयेथील दगड मऊ
होऊन त्यावर भरत आणि राम यांच्या चरणांचे ठसे उमटले आहेत.

सर्व भक्तजनांचा भगवान श्रीराम आणि सर्वकालिक प्रजेचा प्रभु श्रीरामचंद्र ! सर्वार्थाने आदर्श अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा आदर्श घेऊन आणि धर्माचरण अन् साधना करून रामराज्याच्या स्थापनेकरता कटीबद्ध होऊया ! श्रीरामाचे आदर्श धर्मपालन आठवून नियमित धर्माचरण करून प्रभुकृपेला पात्र होऊया ! प्रभु श्रीरामचंद्रांनी वनवासात अनंत लीला केल्या. त्या काळात श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !