श्राद्धात जेवण वाढण्याची पद्धत

Article also available in :

१. पितृपात्रास (पितरांसाठीच्या पानास) उलट्या दिशेने (घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने) भस्माची रेघ काढावी.

२. जेवण मोहाच्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर वाढावे.

३. श्राद्धीय ब्राह्मणांच्या पानात मीठ वाढू नये.

४. पक्वान्ने (लाडू वगैरे) हातानेच वाढावीत; पण भाजी, कोशिंबीर, चटणी इत्यादी पदार्थ कधीही हाताने वाढू नयेत. त्यासाठी पळी, चमचा यांचा वापर करावा.

५. पानावर पदार्थ वाढण्याचा क्रम, जागा आणि त्यामागील शास्त्र

श्राद्धदिनी पानाच्या डाव्या, उजव्या, समोरील आणि मध्य अशा चारही भागांतील (चौरस) पदार्थ सांगितलेले आहेत.

अ. सुरुवातीला पानास तूप लावावे.

आ. मध्यभागी भात वाढावा.

इ. उजवीकडे खीर, अळु आणि फळभाजी वाढावी.

ई. डावीकडे लिंबू, चटणी आणि कोशिंबीर वाढावी.

उ. समोर सांबार (आमटी), कढी, पापड, कुरडई, भजी आणि माषवटक (उडदाचे वडे), लाडू हे पदार्थ असावेत.

ऊ. शेवटी भातावर तूप आणि डाळवरण वाढावे.

शास्त्र : ‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’ (श्री. नीलेश चितळे यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्वरी ज्ञान, ५.७.२००६)

६. जेवण वाढतांना एकाला कमी आणि दुसर्‍याला जास्त, एकाला चांगले अन् दुसर्‍याला निकृष्ट, असे करू नये. श्राद्धादिवशी तर असा भेदभाव मुळीच करू नये.

७. श्राद्धविधी पूर्ण झाल्याविना लहान मुले, अतिथी यांना वा इतर कुणालाही अन्न देऊ नये.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ -‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)

Leave a Comment