विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्‍यांना होणारे लाभ

‘श्रद्धेने करतो ते श्राद्ध’ असे जरी असले, तरी अश्रद्ध व्यक्तीला श्राद्धामागील हिंदु धर्माचा आध्यात्मिक दृष्टीकोन ज्ञात झाल्यास त्याचा श्राद्ध या धार्मिक कृतीवर विश्वास तरी नक्की बसेल ! मात्र, त्या विश्वासाचे रुपांतर श्रद्धेत होण्यासाठी प्रत्यक्षात श्राद्ध करूनच त्याची अनुभूती घ्यायला हवी.

प्रस्तूत लेखातून आपण मरणोत्तर विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्‍यांना होणारे लाभ जाणून घेऊ. यांतून हिंदु धर्माने सांगितलेला ‘श्राद्ध’ हा विधी किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला लक्षात येईल.

शास्त्रामध्ये एकूण ९६ प्रकारची श्राद्धे सांगितलेली आहेत. त्यांपैकी एकोदि्दष्ट, सपिंडीकरण, पार्वण, महालय आणि नांदी हे पाच प्रकार प्रचलित आहेत.

 

१. मरणोत्तर विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्‍यांना होणारे लाभ

पुढे दिलेली श्राद्धे ही चढत्या क्रमाने फलप्राप्ती करून देतात. ती केल्याने त्या त्या स्तरावरील फलप्राप्तीच्या प्रमाणात पितर पुढच्या पुढच्या गतीला प्राप्त होतात. त्यांचे पृथ्वीवरील सजीव अन् निर्जीव घटकांशी असलेले बंध संपुष्टात येण्यास साहाय्य होऊन ते आणि श्राद्ध करणारे यजमान मुक्त जीवन जगू शकतात. पितरांना इष्ट गती प्राप्त झाल्याने साधना करतांना यजमान अन् त्याच्या कुटुंबियांना येणार्‍या अडचणींचे प्रमाणही अल्प झाल्याने त्या सर्वांना साधना करणे सुकर होते.

१ अ. एकोदि्दष्ट श्राद्धे

१ अ १. पाथेय श्राद्ध (मृत्यूनंतर पहिल्या दिवशी करावयाचे श्राद्ध)

मृत्यूनंतर पहिल्या दिवशी अंत्येष्टी विधीमध्ये, म्हणजेच प्रत्यक्ष देहाचे अग्नीत दहन होतांना देहातून अनेक रज-तमात्मक टाकाऊ वायू बाहेर पडत असतात. या वायूंना प्रथम गती देऊन मृतदेहाला मार्गस्थ करणे, म्हणजेच पाथेय श्राद्ध. या विधीमध्ये विधीयुक्त संकल्पातील मंत्रशक्तीमुळे उपप्राणांच्या समवेत असलेले देहातील टाकाऊ वायूंचे सूक्ष्म धाग्यांच्या रूपातील संबंध संपुष्टात येऊन देह हलका होऊन प्रत्यक्ष गती धारण करतो. यानंतरच मृतदेहाचे रूपांतर प्रेतात होण्यास आरंभ होतो.

१ अ २. नग्नप्रच्छादन श्राद्ध (मृत्यूनंतर पहिल्या दिवशी करावयाचे श्राद्ध)

यातून प्रक्षेपित होणार्‍या मंत्रोच्चाराशी संबंधित लहरींमुळे प्रेताच्या स्थूलदेहाशी संबंधित रज-तमात्मक टाकाऊ वायूंचे विघटन होण्यास साहाय्य होऊन त्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते.

१ अ ३. नवश्राद्ध (मृत्यूनंतर पहिले नऊ दिवस प्रतिदिन एक याप्रमाणे करावयाचे श्राद्ध)

या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे त्या त्या दिवशी वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे लिंगदेहावरील काळ्या आवरणाचे उच्चाटन केले जाते.

१ अ ४. अस्थीसंचयन श्राद्ध (दहनकि्रयेनंतर अस्थीसंचयन करावयाच्या दिवशी करावयाचे श्राद्ध)

या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींतून लिंगदेहाचे त्याच्या हाडांशी असलेले उपप्राणात्मक आसक्तीयुक्त रज-तमात्मक बंध तोडून टाकून लिंगदेहाला त्यात बद्ध असलेल्या रज-तमात्मक स्थूलदेहाच्या आसक्तीयुक्त संस्कारातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

१ अ ५. काकबली (दशमदिन विधी) (दहाव्या दिवशी करावयाचे श्राद्ध)

दहाव्या दिवशी लिंगदेहाला काकस्पर्शाच्या माध्यमातून मंत्रोच्चाराने भारित पिंडयुक्त हविर्भाग दिला जाऊन लिंगदेहातील अन्नदर्शक आसक्तीयुक्त रज-तमरूपी संस्कारात्मक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करून पृथ्वीमंडल भेदण्यासाठी आवश्यक बळ पुरवले जाते.

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘काकबली’ हा स्वतंत्र लेख आहे. तो वाचण्यासाठी येथे ‘कि्लक’ करा !

१ अ ६. महैकोदि्दष्ट श्राद्ध (११ व्या दिवशी करावयाचे श्राद्ध)

या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींच्या सामर्थ्यावर लिंगदेह पुढची गती धारण करून मर्त्यलोकात प्रवेश करतो.

१ अ ७. रुद्रगण श्राद्ध आणि वसुगण श्राद्ध (११ व्या दिवशी एकोदि्दष्टानंतर अकरा रुद्र आणि आठ वसु यांना उद्देशून करावयाची श्राद्धे)

यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींच्या बळावर मंत्रोच्चारातून त्या त्या गणांना आवाहन करून लिंगदेहाला गती देण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून त्यांना प्रसन्न करून घेतल्याने, लिंगदेहाला त्या त्या योनीतून पुढे पुढे नेण्याचे दायित्व त्या त्या रुद्ररूपी शक्तीगणांवर आणि प्रवाही, म्हणजेच गतीत सातत्य राखण्याचे कार्य करणार्‍या वसुगणांवर सोपवली जाते. रुद्रगण एकदाच ऊर्जेचे आघातात्मक बळ प्रदान करून लिंगदेहाला पुढे ढकलतात आणि पुढे या गतीत सातत्य राखण्यासाठी वसुगण साहाय्य करतात.

१ अ ८. मासिक श्राद्ध (प्रतिमास त्याच तिथीस येणारे श्राद्ध)

या श्राद्धामुळे लिंगदेहाला बाह्य तेजतत्त्वात्मक बळ प्राप्त होऊन त्याच्या मार्गातील वाईट शक्तींच्या अडथळ्याला वेळोवेळी दूर केले गेल्यामुळे लिंगदेहाला त्या त्या योनीत जगणे सुकर आणि सुलभ होते. या श्राद्धातून लिंगदेहाचे त्याच्या कुटुंबियांशी असलेले स्मरणात्मक बंध तुटण्यास साहाय्य होऊन त्याचा भूमंडलाशी असलेला आणि आठवणींच्या बंधनात बद्ध असणारा इच्छालहरींयुक्त रज-तमात्मक बंध तोडला जातो.

१ अ ९. ऊनमासिक श्राद्ध (एक मास पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी करावयाचे श्राद्ध)

या श्राद्धाच्या संकल्पातून लिंगदेहाच्या दिशेने तेजोमय लहरींच्या ऊर्जात्मक प्रवाहाला प्रक्षेपित करून त्यातून प्रक्षेपित होणार्‍या आकर्षणयुक्त लहरींच्या कक्षेच्या साहाय्याने लिंगदेहाला श्राद्धस्थळी आधीच आकृष्ट करण्यास आरंभ केला जातो. यामुळे त्यानंतर केलेल्या श्राद्धविधीचे फळ लिंगदेहाला अल्प कालावधीत मिळण्यास साहाय्य होते.

१ अ १०. त्रैपाकि्षक श्राद्ध (पंचेचाळीस दिवसांनी करावयाचे श्राद्ध)

पंचेचाळीस दिवसांमध्ये लिंगदेह कर्मानुसार त्या त्या स्तरावरील मर्त्यलोकात रुळण्यास आरंभ झाल्याने त्याला त्या ठिकाणी स्थिर करण्यासाठी श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींच्या साहाय्याने बळ पुरवून संरक्षककवचात बद्ध केले जाते आणि पुढचा श्राद्धादी कर्माचा विधी आरंभ होण्यापर्यंत संरक्षण दिले जाते.

१ अ ११. ऊनषण्मासिक श्राद्ध (सहा मास पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी करावयाचे श्राद्ध)

या श्राद्धविधीतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींच्या आधारे त्या त्या योनीत पूर्वजरूपी वाईट शक्तींच्या विळख्यात बद्ध होऊन आक्रमणाला बळी पडलेल्या लिंगदेहाला मुक्त करून त्याच्या भोवती आलेल्या काळ्या शक्तीच्या आवरणाला छेद दिला जाऊन त्याचे जडत्व न्यून केले जाते. त्यामुळे त्यानंतर केल्या जाणार्‍या श्राद्धविधीतील संकल्पाचे बळ त्याला पूर्णतः प्राप्त होऊन त्याला वेगाने पृथ्वीमंडलात प्रवेश करणे शक्य होते.

१ अ १२. ऊनाबि्दक श्राद्ध (एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी, म्हणजे अब्दपूर्ती श्राद्धाच्या आदल्या दिवशी करावयाचे श्राद्ध)

या श्राद्धातून करण्यात येणार्‍या विधीवत संकल्पामुळे लिंगदेहाला मर्त्यलोकाचा शेवटचा स्तर भेदून जाण्याचे बळ प्रदान केले जाऊन त्याला पुढच्या लोकात जाण्यासाठी प्रवाहात्मक ऊर्जारूपी दिशा दिली जाऊन तसा मार्ग उपलब्ध करून दिला जातो.

१ आ. तिघांच्या उद्देशाने करावयाची श्राद्धे

१. सपिंडीकरण श्राद्ध (ऊनाबि्दक श्राद्धाच्या दिवशी ऊनाबि्दक श्राद्ध केल्यानंतर करावयाचे श्राद्ध; परंतु सध्या १२ व्या दिवशी केले जाते.)

या श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या संकल्पयुक्त तेजोमय लहरींमुळे पित्रादी त्रयींभोवतीचे वायूमंडल शुद्ध होण्यास साहाय्य होते, तसेच या विधीतून त्यांना एकमेकांजवळ येण्यासाठी प्रवाही गती प्रदान केली जाऊन त्यांच्या मार्गातील वाईट शक्तींच्या अडथळ्यांचे निर्दालन केले जाऊन त्यांना एकमेकांशी घनिष्टरीत्या जोडले जाते.

२. पार्वण श्राद्ध (अब्दपूर्ती श्राद्ध, निधनानंतर एक वर्षाने येणार्‍या त्याच तिथीच्या आदल्या दिवशी करण्यात येणारे वर्षपूर्ती श्राद्ध)

या श्राद्धातील संकल्पातून प्रक्षेपित होणार्‍या वेगवान ऊर्जेमुळे लिंगदेह मर्त्यलोकातून एकाच आघातात्मक नादातून पुढच्या लोकाच्या दिशेने फेकला जातो.

३. पार्वण श्राद्ध (दि्वतीयाबि्दक, दुसर्‍या वर्षाच्या प्रारंभी करावयाचे श्राद्ध)

पित्रादी त्रयीस संबोधून त्यांना श्राद्धाच्या संकल्पातून आवाहन करून हे श्राद्ध केले जाते. यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींच्या साहाय्याने आधीच्या तीन पिढ्यांतील पितरांना हविर्भाग दिला जाऊन त्यांना संतुष्ट करून श्राद्धस्थळी आकृष्ट केले जाऊन त्यांचीही शुद्धी केली जाऊन त्यांना तेजोमय बंधनाने एकमेकांशी जोडले जाते. या तेजोबंधनातून एकमेकांना साहाय्य करणे पितरांना शक्य होते. या श्राद्धामुळे निर्माण झालेल्या तेजोबंधनामुळे पितरांच्या एकमेकांशी येणार्‍या संपर्कात वाईट शक्तींचा अडथळा येण्याचे प्रमाणही अल्प होते.

टीप – प्रथम मासिक श्राद्धापासून ऊनाबि्दक श्राद्धापर्यंतची श्राद्धे सोळा मासिक श्राद्धांमध्ये मोडतात.

४. भरणी श्राद्ध (भाद्रपद मासात कृष्ण पक्षातील भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध)

‘कृष्ण पक्षातील भरणी नक्षत्रातील तारकांच्या त्रिकोणी योनीची देवता यम आहे, तसेच या नक्षत्रावर श्राद्ध केल्याने या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असलेल्या यमलहरींचे बळ मिळून पितरांना लवकर गती प्राप्त होते. या दिवशी इच्छाशक्तीशी संबंधित यमलहरींचे या विधीत कार्य करण्याचे प्रमाण अधिक असल्याने याचा पितरांना लाभ मिळण्यास साहाय्य होते; म्हणून भरणी श्राद्धाला विशेष महत्त्व आहे.

गया येथील भूमीच्या स्थूल आकृतीबंधावर भूमीलगत ऊर्ध्व दिशेने कार्यरत असलेले कनिष्ठ, म्हणजेच पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित इच्छालहरींनी बनलेले सूक्ष्म-आच्छादन हे ति्रकोणी आकृतीबंधात सामावलेले असल्याने, गयाभूमीला इच्छेशी संबंध दर्शवणारी ‘त्रिकोणी योनी’ असे म्हणतात. हे क्षेत्र कनिष्ठ इच्छालहरींनी भारित असल्याने या ठिकाणी विधी केले असता ते कनिष्ठ आसक्तीदर्शक इच्छालहरींशी संबंधित कार्याशी निगडित असलेल्या पितरांच्या संदर्भात अधिक प्रमाणात फलद्रूप होतात. भरणी नक्षत्र हेही तीन तारकांच्या त्रिकोणाने बनलेले असल्याने या नक्षत्रालाही ‘अवकाश मंडलातील त्रिकोणी योनीक्षेत्र’, असे म्हणतात. गयाक्षेत्र आणि भरणी नक्षत्र क्षेत्र यांमध्ये साधर्म्य आहे. भरणी नक्षत्रावर श्राद्ध करून पितरांना आवाहित केले असता भूतलावर असणार्‍या या नक्षत्राशी संबंधित इच्छालहरी कार्यमान होऊन ते ते क्षेत्र प्रत्यक्ष गयाभूमीच बनते. यामुळे गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फळ मिळते, असे सांगितले आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी २.४५ आणि सायं. ६.४९)

 

२. विवाहादी मांगलिक प्रसंगी नांदीश्राद्ध का करतात ?

‘पुत्रजन्म, उपनयन आणि विवाह या पितरांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या प्रसंगी प्रथम नांदीश्राद्ध करून त्यांना तो तो हविर्भाग अर्पण केला जाऊन संतुष्ट केले जाते. यामुळे या प्रसंगांत उद्भवणार्‍या पूर्वजरूपी लिंगदेहांच्या वासनायुक्त अडथळ्यांचे प्रमाण अल्प होऊन ते ते कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यास साहाय्य होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००६, रात्री ८.५७)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment