श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे

श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे ही महत्त्वाची कृती असल्याने त्यामागील शास्र जाणून घेणे आवश्यक ठरते. यादृष्टीने लेखात पितरांसाठीचे पिंड दर्भावर का ठेवतात, देवता आणि पितरांना नेवैद्य कसा दाखवावा इत्यादी सूत्रांमागील शास्र आपण पाहू. 

श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे चलच्चित्रपट (Video)

 

१. पितरांना पिंडरूपी अन्न अर्पण करतांना ते दर्भावर का केले जाते ?

 

‘दर्भातील तेजरूपी वायूलहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या काळ्या जडत्वदर्शक लहरींचे विघटन होत असल्याने लिंगदेह अन्नातील सूक्ष्म-वायू सहज ग्रहण करू शकते. त्यामुळे पितरांना अन्न अर्पण करतांना ते दर्भावर केले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.९.२००५, सायं. ६.२०) 

(शास्त्रानुसार पितरांना अन्न अर्पण करतांना ते दर्भावर केले जाते. मात्र सध्याच्या काळात त्यासाठी पत्रावळ वापरली जाते. – संकलक) 

‘पितरांसाठीच्या ताटात नेहमीपेक्षा उलट पद्धतीने अन्नपदार्थ वाढल्याने रज-तमात्मक लहरी उत्पन्न होऊन मृतात्म्याला अन्न ग्रहण करणे शक्य होते.’ (श्री. नीलेश चितळे यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्वरी ज्ञान, ५.७.२००६, सायं. ७.२७)

 

१ अ. यजमानाने दर्भांवर पिंड ठेवून
त्याचे पूजन करतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे चित्र

 

 

 

१. ‘चित्रातील त्रासदायक स्पंदने : २ टक्के’ – प.पू. डॉ. आठवले 

२. ‘चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : भाव १ टक्का, चैतन्य १ टक्का, शक्ती ३.७५ टक्के आणि आकृष्ट होणारी त्रासदायक शक्ती १.७५ टक्के 

३. इतर सूत्रे : दर्भांवर पिंड ठेवून तूप आणि जळलेल्या दर्भाची काजळी दर्भांना लावणे, लोकरीचा धागा पिंडावर वहाणे, अशा कृती झाल्यावर फूल, तुळस, माका, धूप, दीप आदींचे पिंडांवर उपचार करून त्यांचे पूजन करतात. 

अ. हा विधी करतांना विधीतून शक्तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होऊन ती पूजकाला प्राप्त होतात. 

आ. पिंडांचे पूजन केल्याने अतृप्त पितर भुवलोकातून पिंडांकडे सहज आकृष्ट होतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते. अशा प्रकारे पूर्वजांचे त्रास न्यून होतात. 

इ. यजमानाने भावपूर्ण पिंडपूजन केल्यामुळे त्याला होणारे पूर्वजांचे त्रास न्यून होतात.’ 

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (भाद्रपद शुद्ध दशमी, कलियुग वर्ष ५१११ (३०.८.२००९)) 

१ आ. अनुभूती
सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढतांना ‘माझ्या पितरांचे पूजन करत आहे’, अशा भावाने ते काढल्यावर स्वतःवर येत असलेले आवरण दूर होऊन उत्साह जाणवू लागणे

‘यजमानाने दर्भावर पिंड ठेवणे हे सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढतांना मला माझ्यावर काळ्या शक्तीचे आवरण येत असल्याचे जाणवले. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढतांना मी ‘माझ्या पितरांचे पूजन करत आहे’, अशा भावाने हे चित्र काढले. ज्या वेळी चित्र पूर्ण झाले, त्या वेळी मला माझ्यावरील आवरण दूर होऊन उत्साह जाणवू लागला.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था 

 

२. श्राद्धविधीतील देवतांना नैवेद्य दाखवणे

 

श्राद्धविधीसारखे अशुभ कर्म हे देवतांच्या कनिष्ठ, म्हणजेच पृथ्वी आणि आप या कनिष्ठ तत्त्वांशी संबंधित असते. त्यामुळे या विधीतील नैवेद्य दाखवणे हे कर्म जास्त प्रमाणात भूमीशी, म्हणजे पृथ्वीतत्त्वाशी संलग्नता दर्शवणारे असते. पितरविधीतील कनिष्ठ देवतांच्या लहरी या अधोदिशेने (भूमीच्या दिशेने) कार्यरत असतात. त्यामुळे त्या दिशेला प्रधान मानून तो दर्शक विधी केला जातो. 

 

३. देवता आणि पितर यांना नैवेद्य दाखवण्याच्या पद्धतींचे शास्त्र

३ अ. कृती

श्राद्धात देवतांना नैवेद्य दाखवतांना वङ्काासनात बसून उजवा गुडघा खाली टेकवतात. त्यानंतर नैवेद्याच्या पानाच्या खाली डावा हात आणि वर उजवा हात ठेवावा. तसेच पितरांना नैवेद्य दाखवतांना डावा गुडघा खाली टेकवून नैवेद्याच्या पानाच्या खाली उजवा हात अन् वर डावा हात ठेवावा.

 

३ आ. शास्त्र

‘वज्रासनात बसून उजवा गुडघा खाली टेकवणे, हे देहातील कार्यरत शक्तीचा व्यय करून, म्हणजेच तिला त्यागून ‘स्व’रूपी अहं न्यून करून डावी नाडी कार्यरत करून त्यायोगे देवतेच्या निर्गुणाशी संबंधित लहरी ग्रहण करण्याचे प्रतीक आहे. उजवा गुडघा खाली टेकवून डावा गुडघा पोटाशी घेऊन होणार्‍या मुद्रेमुळे नाभीचक्रावर दाब येऊन डावी नाडी कार्यरत होते, तर याउलट कृती केल्याने सूर्य नाडी कार्यरत होऊन रजोगुणाच्या आधारे पितरांना आवाहन करणे शक्य होते. 

देवतांच्या पानाखाली डावा हात ठेवून उजवा हात पानावर ठेवणे, हे उजवा हात प्रधान ठेवून त्याद्वारे देवतांचे स्वागत करण्याचे, म्हणजेच शुभसूचकतेचे दर्शक आहे, तर उलट पद्धतीने पितरांसाठी ही कृती करणे, म्हणजेच देवतांपेक्षा कनिष्ठ स्तरावर असलेल्या पितरांचे स्वागत करण्यासाठी गौण प्रधानतेचे लक्षण म्हणून अशुभ विधीदर्शक डावा हात प्रधान, म्हणजेच पानाच्या वर ठेवून उजवा हात पानाच्या खाली ठेवणे होय.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, सायं. ५.३४)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment