सनातनच्या साधकांना मिळणारे कल्पनातीत आध्यात्मिक ज्ञान !

‘कथा आणि कादंबर्‍या यांमधून मांडण्यात येणार्‍या संकल्पना काल्पनिक असतात. त्यात मांडलेल्या विचाराला विज्ञानाचा आधार नसतो. सध्याचा भ्रमणभाषचा शोध हा १८ – १९ व्या शतकातील लोकांसाठी कल्पनातीत होता. काल्पनिक आणि कल्पनातीत या दोन शब्दांमध्ये असा भेद आहे. तशाच प्रकारे सनातनच्या काही साधकांना मिळणारे विविध विषयांवरील ज्ञान हे ‘कल्पनातीत’ आहे. या ज्ञानात दिलेली एखाद्या घटनेमागील आध्यात्मिक कारणमीमांसा … Read more

कुठे हिंदु धर्माची श्रेष्ठता कळणारी उपकरणे तर कुठे अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले !

‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो !

‘प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो. प्रजा हल्लीसारखी स्वार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात निष्क्रीय असली, तर लोकशाही कशी असते, याचे भारत हे जगातील एकमेव केविलवाणे उदाहरण आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा साधकांच्या चपलांप्रतीचा उच्च भाव !

आपल्या साधकांच्या चपला म्हणजे ‘गुरुपादुका’च आहेत. ‘वस्तू काय आहे ? कुणाची आहे ?’, यापेक्षा त्या वस्तूप्रतीचा भाव महत्त्वाचा आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

खरी ‘देवपूजा’

‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

‘म्हणे, साम्यवाद !

शरीर, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात जगातील ७५० कोटींपैकी कोणत्याही दोन व्यक्तींत साम्य नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मंदिराच्या विश्वस्तांनी दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली तर त्यांना विश्वस्तपद शोभून दिसेल !

‘मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्‍हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे. दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली, तरच दर्शनार्थींना काहीतरी दिल्यासारखे होईल आणि तुम्हाला विश्वस्तपद शोभून दिसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांकडे सकाम साधना करणारे सहस्रो भक्त असतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी फारतर १ – २ शिष्यच असतात !

‘बहुतांश संत हे व्यष्टी प्रकृतीचे असतात. ते मानसिक स्तरावर राहून येणार्‍यांची व्यावहारिक दुःखे दूर करण्यावरच भर देतात. ते त्यांच्याकडे येणार्‍यांकडून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांमध्ये ‘स्वतःच्या व्यावहारिक अडचणी सुटाव्यात’, यासाठी येणार्‍या भक्तांचीच संख्या अधिक असते. त्या संतांकडून साधना शिकून शिष्य पदापर्यंत पोचणारे क्वचितच १ – २ जणच असतात. बर्‍याचदा संतांच्या पश्चात … Read more

देशभक्त आणि धर्माभिमानी हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले