अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण ज्या प्रमाणात किंवा ज्या टप्प्याची साधना (कृती) करू, त्या टप्प्याचे अध्यात्माचे विविध पैलू अनुभूतींच्या माध्यमातून लक्षात येऊ लागतात. प्रत्येक टप्प्याची अनुभूती येण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साधना करून त्यासाठी सक्षम (पात्र) असणेही आवश्यक असते. कुणालाही पैसे देऊन अनुभूती विकत घेणे शक्य नसते. दुसरे म्हणजे एखाद्याने पात्रता नसतांना ती घेण्याचा प्रयत्न … Read more

निवडणुका हा पोरखेळ झाला आहे

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकीय पक्ष आणि साधक यांच्यातील भेद !

‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेच्या प्रयत्नांची ताकदच आपत्काळात आपल्याला तारून नेईल !

‘साधनेसाठीच्या अनुकूल परिस्थितीत साधनेचे प्रयत्न चांगले होतात. साधनेसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत मात्र साधनेचे प्रयत्न चांगले होणे, हे साधनेच्या प्रयत्नांच्या ताकदीवर अवलंबून असते. ही ताकद प्रयत्नांची तळमळ आणि प्रयत्नांमधील नियमितता यांवर अवलंबून असते. ‘आगामी आपत्काळात कोणकोणत्या भीषण परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागेल’, याचा आपण आता अंदाजही करू शकत नाही. यासाठी आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण … Read more

साधना केल्याने आयुष्यभर आनंद मिळतो !

‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्‍याला आयुष्यभर आनंद मिळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)

लोकांच्या प्रारब्धानुरूप समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, म्हणजे त्यांना साधना न शिकवता केवळ वरवरची उपाययोजना काढणारे संत !

‘बरेच संत त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. वस्तुतः या सर्व समस्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार किंवा त्याला असणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असतात. त्यावर मूळ उपायोजना म्हणजे संबंधितांनी साधना करणे. संतांनी स्वतःची साधना खर्च करून त्यांच्या भक्तांच्या अडचणी दूर केल्या, तर तो भक्त परावलंबी होतो आणि प्रारब्धभोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव … Read more

गुरूंच्या छत्रछायेचे महत्त्व !

साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)

सात्त्विक संगीत आणि तमोगुणी संगीत यांचा देहावर होणारा परिणाम अन् भारतीय संगीताचे वैशिष्ट्य

उच्च पातळीचे सात्त्विक संगीत ऐकल्यावर त्या संगीतामध्ये रममाण होऊन आपले डोके आपोआपच डोलू लागते. खालच्या पातळीचे, म्हणजे तमोगुणी संगीत ऐकल्यावर मनुष्याच्या शरिराचा रज-तमप्रधान दर्शक कटीखालचा भाग आपोआप हलू लागतो; म्हणूनच विदेशी संगीतावर सर्वजण कटी हलवून नाचतात, तर भारतीय संगीत मात्र शरिरासमवेतच तुमच्या मनालाही आनंद देते. भारतीय संगीतावर तुमचे मनही डोलते. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ … Read more

साधना करतांना आपले क्रियमाणही वापरणे आवश्यक !

आजारी साधकाने त्याची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करायलाच हवेत. त्याशिवाय वैद्यकीय उपचारही करायला हवेत, तरच लवकर बरे वाटते. साधना करतांना सर्वकाही देवावर सोडून उपयोगाचे नाही; आपले क्रियमाणही वापरले पाहिजे, तरच योग्य पद्धतीने साधना केल्यासारखे होते. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)