साधनेत स्वतःकडे तटस्थपणे पहाण्याचे महत्त्व !
स्वतःकडे तटस्थपणाने पहाणे, ही लवकर संत बनण्याची प्रक्रिया असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
स्वतःकडे तटस्थपणाने पहाणे, ही लवकर संत बनण्याची प्रक्रिया असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
उत्तम नेतृत्व करण्यापूर्वी उत्तम साधक बनले पाहिजे. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
आपण संघर्षाला ईश्वराकडे घेऊन जायला हवे. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
‘आपल्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती ही भगवंताची इच्छा आहे’, असे समजावे. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त … Read more
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या दीर्घकाळ रुग्णाईत असणार्या रुग्णावर उपचार केल्यावर तो बरा झाल्यास, त्या वैद्यालाच त्या रुग्णापेक्षा कितीतरी अधिक आनंद होतो ! त्याप्रमाणे एखादा साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतो, तेव्हा त्याच्या गुरूंना किती आनंद होत असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१९.६.२०२२)
‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
नामजप करतांना मनात विचार येत असल्यास सूक्ष्मातून हवेत किंवा समोरील भिंतीवर नामजप लिहावा आणि तो पुनःपुन्हा वाचावा. त्यानंतर तो श्वासाला जोडावा. असे केल्याने नामजप एकाग्रतेने होतो.’ – पू. भगवंत कुमार मेनराय
नामजप करत असतांना श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याला नामजप जोडावा. नामजपाला श्वास जोडण्याचा प्रयत्न करू नये; कारण तसे करतांना लय साधली गेली नाही, तर गुदमरल्यासारखे होईल. – पू. भगवंत कुमार मेनराय
