गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याचे महत्त्व !

गुरुमुखातून आलेले शब्द नादरूपाने आकाशमंडलात रहातात. गुरूंचे हे चैतन्यमय शब्द प्रत्यक्षात उतरवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अध्यात्मात गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे, तरच आपली प्रगती होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते

देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते

‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच मिळणार हिंदूंना आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ लढा !

‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करा !

‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

‘ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांनीच भारताची किंमत राखली !

‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले