आत्मज्ञान

जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात … Read more

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे

प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन / वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या. १. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी. २. प्रार्थना करावी. ३. कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न … Read more

प्रत्येकात भगवंताला शोधण्यासाठी करावयाच्या कृती !

मनाला सातत्याने वळण लावून आत्म्याशी अनुसंधानित करण्याचे प्रयत्न करावा. प्रत्येक कृती, उदा. चालणे, बोलणे, पहाणे आत्म्याशी अनुसंधानित करावी. स्वतः करतो, अशी जाणीव असल्यास कृती करतांना थकवा येतो; मात्र अनुसंधानित कृतीमुळे थकवा येत नाही. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

मायेचा वापर माध्यम म्हणून करावा !

मायेचा वापर माध्यम म्हणून, म्हणजे सध्याच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ (युज अ‍ॅयण्ड थ्रो) या पद्धतीने करायचा. त्यात बद्ध झाल्यास विकार वाढून दोष निर्माण होतात. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१४)

वेळ न मिळणे

जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका. भावार्थ :‘जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता’ म्हणजे पैसा गोळा करता आणि ‘जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता’ म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. ‘याउलट कसे करायचे ते … Read more

आवरण वाढण्याची कारणे आणि उपाय

स्वस्तुतीने आवरण वाढते, तर ईश्‍वराची स्तुती केल्याने आवरण घटते. आत्मानुसंधानात न राहिल्याने आपल्याभोवती त्रासदायक आवरण वाढते. त्यामुळे आत्मशक्ती उणावते (बॅटरीतील वीज न्यून होते). सतत आत्मानुसंधानात रहाणे, हाच यावरील उपाय आहे. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१५.७.२०१४)

आत्मशक्तीवर शारीरिक क्षमता अवलंबून असणे

‘आमची क्षमता शरिरावर नाही, तर आत्म्यावर आहे. आत्मानुसंधानाने ईश्‍वरी शक्ती मिळते. अर्जुनाकडे शक्ती होती; पण श्रीकृष्णाने आत्मशक्ती दिल्यावर तो लढू शकला.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१४)

काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !

‘आईच्या पोटात असतांना आपली काळजी कोण घेत होते ?’ सहा मासांचे (महिन्यांचे) असतांना दूध मिळेल का ? याची काळजी होती का ? मग आता का आहे ? आतापर्यंतचे आयुष्य एका क्षणात गेले. मग पुढील १० वर्षांची काळजी कशाला ? कोणत्याही प्रकारची काळजी करणे म्हणजे श्रीकृष्णावरील अश्रद्धा होय. काळजी आणि चिंता आपल्याला मागे खेचते. आजपर्यंत इतके … Read more

स्वेच्छा, परेच्छा किंवा ईश्‍वरेच्छा याप्रमाणे वागणे

हे शब्द साधनेच्या संदर्भात आहेत, हे लक्षात न घेता एका साधकाने बायकोच्या साधनेला असलेल्या विरोधाला परेच्छा समजून साधना करणे बंद केले. एका जिज्ञासूने विचारले, मित्राने दारू पिण्याचा आग्रह केल्यास परेच्छा म्हणून दारू प्यायची का ? येथे लक्षात घेतले पाहिजे की, अशा वेळी परेच्छेऐवजी ईश्‍वरेच्छा काय असेल ?, याचा विचार करावा. ईश्‍वर कधी साधना करू नको … Read more

सनातन संस्थेच्या साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्याचे कारण

बर्‍याच जणांना आश्‍चर्य वाटते की, फक्त सनातनचे अनेक साधक जलद गतीने प्रगती कशी करतात ? त्यांच्यापैकी अनेकजण संत कसे होतात ? यांचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. १. इतरत्र शिकवतात, तशी वर्षानुवर्षे केवळ तात्त्विक माहिती सनातनमध्ये सांगण्यात येत नाही, तर प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृती शिकवण्यात येतात. २. सर्वांना एकच साधना न सांगता व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग … Read more