सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ध्यानमंदिरात पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण आरास

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरातही आरास करण्यात आली होती.

विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या आणि मेणाच्या पणती नकारात्मक, तर तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपारिक पणती सकारात्मक असल्याचे सिद्ध !

विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी अशी चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला.

दिवाळी : शंकानिरसन

दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावण्याची, तसेच पूर्ण घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नसते. प्रवेशद्वाराशी आणि मागे दार असेल, तर मागच्या द्वाराशी दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत अन् घरात देवघराच्या ठिकाणी दिवा लावावा.

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले.

सतत भावावस्थेत असलेले आणि योगमार्गातून साधना करणारे कुंडल (जिल्हा सांगली) येथील शामराव (आबा) पवार (वय ९२ वर्षे)

श्री. शामराव पवार आजोबांचे वय ९२ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांना चांगले ऐकू येते. ते गावी शेती करतात. त्यांची ‘सोहम्’ ध्यानमार्गातून साधना चालू आहे. ते उत्तम योगासने करतात.

फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा !

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी

‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार करून तमोगुण वाढवणारी जीन्स पँट परिधान करण्याऐवजी सात्त्विकता वाढवणारी वेशभूषा परिधान करणे सर्व दृष्टींनी अधिक लाभदायी !

फुटक्या वस्तू आणि फाटलेले कपडे यांमधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा वापर करणा-या व्यक्तीच्या मनावरही त्याचा दुष्पपरिणाम होतो.

गोमातेचे आध्यात्मिक महत्त्व, तिची सेवा केल्यामुळे होणारे लाभ आणि तिचे रक्षण करणाऱ्यांना मिळणारे फळ

गोमातेच्या देहातील विविध ठिकाणी विविध देवतांचा सूक्ष्मातून वास आहे. गोमातेमध्ये ३३ कोटी देवतांची तत्त्वे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याचे सामर्थ्य आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये सनातन संस्थेचा नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी केलेले धर्मप्रसाराचे कार्य !

श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी वर्ष १९१२ मध्ये माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमी) या दिवशी पालघर, जिल्हा ठाणे येथे संजीवन समाधी घेतली.