कृष्णभक्त संत मीराबाई
ईश्वर निर्गुण-निराकार आणि सगुण-साकारही आहे. निराकार चेतन रूपात सृष्टीत भरलेला आहे. त्याच्याविना कुठेही काही नाही. वस्त्रात सूत असते आणि लाटेत पाणी असते, तसा तो सर्वत्र आहे. त्याच्याविना जगात कुठली सत्ता नाही. या गोष्टी ऐकून विश्वास ठेवावा लागतो. श्रद्धा आणि विश्वास यांच्याविना काही हाताला लागत नाही.