पुणे जिल्ह्यामध्ये सनातन संस्थेचा नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

  • १०० हून अधिक ठिकाणी फलकप्रसिद्धी
  • ६ मंडळांमध्ये शौर्य जागरण पथनाट्य सादर
  • अंदाजे ७५० जिज्ञासूंनी प्रात्यक्षिकांचा घेतला लाभ
  • १०० हुन अधिक जणांनी कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी नावे नोंदवली
  • एका ठिकाणी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी

पुणे – नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

कोथरूड येथील रमांबिका मंदिरात सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

येथील शिवणे आणि ग्रीन सिटी या ठिकाणच्या गृहसंकुलांमध्ये योग्य पद्धतीने ओटी कशी भरावी, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच नवरात्रीच्या संदर्भात अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये शिवणे येथील ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वाचकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. नवरात्रीच्या काळात तीन ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता प्रतिपादित करणारी शौर्य जागरणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. येथे मोठ्या प्रमाणात फलक प्रसिद्धीही करण्यात आली. या कालावधीत नवरात्रीच्या नऊही दिवसात रमांबिका मंदिरात ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

 

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी शिरवळ पोलिसांना निवेदन !

उत्सवाला येऊ लागलेले विकृत स्वरूप रोखण्यासाठी उत्सवांमधील अपप्रकारांना आळा घालण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री सागर जरांडे, धर्मशिक्षणवर्गातील सर्वश्री संकेत पिसाळ, निखिल पाटील, राहुल मोरे, संग्राम कोळी, तेजस यादव, तुषार घोडके, राजवर्धन पाटील, पृथ्वीराज जाधव, अमोल पाटोळे, पृथ्वीराज पाटील, तसेच समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे उपस्थित होते.

 

विशेष

धर्मप्रेमी श्री. सागर जरांडे यांनी पुढाकार घेऊन निवेदन देण्यासाठी अन्य धर्मप्रेमींना निमंत्रण दिले.

 

गावठाण येथील धर्मप्रेमींचा मोहीमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग

येथील अष्टभुजा देवीच्या मंदिरात वितरण कक्ष लावण्यात आला होता. येथील अमोल गारमेंटचे श्री. लाहोटी आणि नक्षत्र साडी सेंटरचे श्री. गणेश तुम्मा यांनी रांगोळी, देवघर आणि  देवतांची मांडणी, देवीपूजन असे १५० ग्रंथ घेतले. सनातन प्रभातचे वाचकही सेवेत सहभागी झाले होते. श्री. गणेश तुम्मा यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांना आध्यात्मिक कृतींचे महत्त्व, रामरक्षा आणि औक्षण, दिवाळी आणि धर्माचरणाचे महत्त्व या संदर्भातील माहिती सांगण्यास सांगितले. हडपसर येथेही ‘आदर्श नवरात्रोत्सव मोहीम’ राबवण्यात आली.

 

सातारा रस्ता येथील धर्मशिक्षण वर्गातील महिलांचा कृतीशील सहभाग

येथे भित्तीपत्रके आणि हस्तपत्रके वाटण्यात आली, तसेच आंबेगाव येथे धर्मशिक्षण वर्गातील महिलांनी प्रसार करून प्रवचन घेण्यात आले. सहकारनगर आणि धनकवडी येथील  ७ नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन नवरात्रीसंबंधीचा विषय सांगितला. धनकवडी येथील २ आणि सहकारनगर येथील ४ अशा ६ पोलीस ठाण्यांमध्ये नवरात्रोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवेदन देण्यात आले. सातारा रस्ता येथील

५ प्रमुख मंदिरांमध्ये भारती विद्यापीठ, पद्मावती आणि अंबामाता मंदिर तसेच आबा बागुल उद्यान अन् सुपर्ण हॉल येथे वितरण कक्षाद्वारे जिज्ञासुंपर्यंत नवरात्रीची माहिती पोचवण्यात आली.

 

सिंहगड रस्ता येथे जिज्ञासु साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होणे

येथे ९ ठिकाणी प्रदर्शन कक्ष तसेच हस्तपत्रिका आणि भिंतीपत्रिका यांच्या माध्यमातून नवरात्रीची माहिती समाजापर्यंत पोचवण्यात आली. नवरात्रोत्सव मंडळांना संपर्क करून विविध ठिकाणे प्रवचने घेतली. माहिती ऐकून काहीजण साप्ताहिकाचे वर्गणीदार झाले.

 

चिंचवड येथे प्रशिक्षण वर्ग आणि धर्मशिक्षण वर्ग यांची मागणी

सौ. कुंभार यांच्या घरी नवरात्र प्रवचन आणि श्री सुक्त हवन केले. त्या वेळी सौ. नागणे यांनी विषय मांडला. गंधर्वनगरी जवळ घेण्यात आलेल्या मार्गदर्शनानंतर जिज्ञासूंनी प्रशिक्षण वर्ग आणि धर्मशिक्षण वर्ग यांची मागणी केली.

या व्यतिरिक्त चिंचवड येथे ९ ठिकाणी वितरण कक्ष उभारण्यात आले. एकूण ३१ ठिकाणी प्रवचने झाली. ४ मंडळामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण दाखवण्यात आले. ८ सोसायटींमध्ये कुंकूमार्चन आणि ओटी भरणे यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ५ ठिकाणी प्रबोधन कक्ष उभारण्यात आले. तसेच २ ठिकाणी धर्मशिक्षण वर्गाची मागणी आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment