हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमंताप्रमाणे वाटा उचला ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले.या सभेस ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.

‘भक्‍त घडेल’, असा मंदिर व्‍यवस्‍थापनाचा अभ्‍यासक्रम असायला हवा ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

जळगाव येथे पार पडलेल्‍या महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेमध्‍ये ‘मंदिराचे सुप्रबंधन (सुव्‍यवस्‍थापन)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्‍यात आला होता. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील विविध भागांतील मंदिरांचे विश्‍वस्‍त, तसेच सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.

मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू केलीच पाहिजे ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

‘‘मंदिरांतील सात्त्विकता ग्रहण करण्‍यासाठी आचरण, वेशभूषा आणि देवतेविषयी भाव आवश्‍यक आहे. देवतेच्‍या तत्त्वाशी जुळवून घ्‍यायचे असेल, तर सत्त्वगुण आवश्‍यक आहे. तो वाढवण्‍यासाठी साधना करायला हवी. तमिळनाडू उच्‍च न्‍यायालयाने मंदिर प्रवेशासाठी वस्‍त्रसंहिता आवश्‍यक असल्‍याचे मान्‍य केले

जळगाव येथे प्रारंभ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत सनातन संस्था सहभागी !

मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी मुंबईमध्ये झालेल्या हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सनातन संस्था सहभागी !

दादर येथील शिवाजी पार्क येथून २९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, अशी मागणी या मोर्च्यामध्ये करण्यात आली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले. रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.

लव्ह जिहादसह हिंदु धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदु तरुणी देशभरात लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. लव्ह जिहादचे नियोजनबद्ध षड्यंत्र पहाता आणखी हिंदु युवती याला बळी पडतील. ‘लव्ह जिहाद’सह विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

निधर्मीवादाच्या विळख्यात अडकलेल्या बहुसंख्य हिंदूंना लव्ह जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद अशा निरनिराळ्या जिहादी प्रकरणांना प्रतिदिन बळी पडावे लागत आहे, तर अखंड सावधान राहून सर्वांनी एकत्रित येऊन हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा.

२८ व्या निवासी कीर्तन शिबिरात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानातील संशोधनापेक्षा भारतियांनी केलेले संशोधन हे अतीप्रगत आणि परिपूर्ण आहे. पाश्चात्त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सहस्रो वर्षे आधी ऋषिमुनी आणि महर्षी यांनी अतीप्रगत आणि परिपूर्ण संशोधन केलेले आहे.