सतत भावावस्थेत असलेले आणि योगमार्गातून साधना करणारे कुंडल (जिल्हा सांगली) येथील शामराव (आबा) पवार (वय ९२ वर्षे)

प.पू. गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले श्री. शामराव पवार !

‘१६.९.२०१७ या दिवशी श्री. शामराव पवारआजोबा गोव्याच्या रामनाथी आश्रमात आले होते. आजोबांचे वय ९२ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांना चांगले ऐकू येते. ते गावी शेती करतात. त्यांची ‘सोहम्’ ध्यानमार्गातून साधना चालू आहे. ते उत्तम योगासने करतात. त्यांना रामनाथी आश्रम पहाण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची पुष्कळ तळमळ लागली होती.

श्री. शामराव पवार यांच्या ब्रह्मरंध्रावर छिद्र पडले आहे. (वरील छायाचित्रात गोलात दाखवलेले बाजूला मोठे करून दाखवले आहे.) हे आध्यात्मिक प्रगतीचे दर्शक आहे.
श्री. शामराव पवार यांनी ९२ व्या वर्षीही केलेले एक योगासन तरुणांनाही लाजवेल
एका आसनाद्वारे या वयातही भूमीपासून देह वर उचलून धरणारे श्री. शामराव पवार
लाठीकाठीचे प्रात्यक्षिक करणारे श्री. शामराव पवार सर्वांसाठी प्रेरणादायीच आहेत.

१. आजोबांची जाणवलेली वैशिष्ट्ये

अ. आजोबांचा तोंडवळा सात्त्विक आहे. या वयातही ते थकलेले वाटत नाहीत.

आ. त्यांचे डोळे पाणीदार असून डोळ्यांत भाव जाणवतो आणि ‘ते सतत भावावस्थेत आहेत’, असे वाटते.

इ. आजोबांचा तळहात गुळगुळीत झाला असून त्यावर रेषा दिसत नाहीत.

त्यांना पाहिल्यावर ‘त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली असावी’, असे वाटते.’

– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, गोवा. (२४.९.२०१७)

ई. आजोबांचे वय ९२ वर्षे आहे; परंतु ‘त्यांचे वय ७० वर्षांच्या जवळपास असेल’, असे मला वाटलेे. त्यांची रहाणी साधी आणि विचारसरणी उच्च आहे.

उ. आजोबा नेहमी आनंदी असतात. त्यांचा तोंडवळा शांत वाटतो. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज आहे. ते म्हणाले, ‘‘पावडर लावून तोंडवळा सुंदर करण्यापेक्षा साधना करून तो सुंदर बनवला पाहिजे.’’

ऊ. आजोबांचा योगाभ्यास अचंबित करण्यासारखा असून ‘ते आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत आहेत’, असे मला जाणवले.

काही वेळातच माझी त्यांच्याशी पुष्कळ जवळीक निर्माण झाली.’

– श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, गोवा. (२०.९.२०१७)

२. २० वर्षांपूर्वी झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीच्या ओढीने आश्रमात येणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन जाहीर सभा घेत असत. सांगली जिल्ह्यातील सभा चालू असतांना त्यांची पलूस येथेही सभा झाली होती. त्या वेळी आजोबा परात्पर गुरुदेवांना प्रथमच भेटले आणि त्या भेटीत गुरुदेवांनी आजोबांना आलिंगन दिले. आजोबांच्या ते आजही स्मरणात असून त्या भेटीच्या ओढीनेच ते आश्रमात आले.’

– कु. मेघा चव्हाण

३. उत्साहाने आणि भावपूर्णरित्या आश्रमदर्शन करणे

३ अ. प.पू. गुरुदेवांशी संबंधित वस्तू अत्यंत आपुलकीने पहाणे

‘मी आजोबांना आश्रम दाखवत होते. जतन वस्तूंचे प्रदर्शन पहातांना आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील जतन केलेल्या वस्तू, तसेच त्यांच्याशी संबंधित इतर भाग पहातांना ते अत्यंत आपुलकीने, भावपूर्णपणे आणि लक्ष देऊन ऐकत होते. त्यांनी पूर्ण आश्रम भावपूर्णरित्या, उत्साहाने आणि आनंदाने पाहिला.

३ आ. पू. सौरभदादांच्या भेटीच्या वेळी आजोबा भावस्थितीत असणे

आजोबा पू. सौरभदादांना भेटले. तेव्हा ते ५ मिनिटे भावस्थितीतच होते. पू. दादा आजोबांना ‘‘बस, बस…खाऊ, खाऊ’’, असे सारखे म्हणत होते. तेथे आलेल्या सर्वांना खाऊ देऊन झाल्यानंतरही पू. दादा ‘खाऊ … खाऊ’, असे म्हणत होते. तेव्हा पू. दादांच्या वडिलांनी ‘‘आजोबांना खाऊ देऊ का ?’’, असे विचारले असता ते आनंदाने ‘‘हो’’, असे म्हणाले.

३ इ. कलामंदिराची माहिती ऐकून त्यांना भावाश्रू आवरले नाहीत. त्या वेळी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

आजोबांना आश्रम दाखवतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘आजोबांचा आध्यात्मिक स्तर चांगला असावा’, असे मला वाटले. ‘आजोबांसारखा उत्साह, तत्परता आणि भाव आमच्यातही यावा’, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– सौ. अमृता देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट

४ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरु लाभल्याने सर्व साधक भाग्यवान आहेत’, असे आजोबांनी सांगणे

आजोबा साधकांना म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांचे विमान आहे आणि आमची बैलगाडी आहे. (म्हणजे प.पू. गुरुदेवांची गती पुष्कळ आधिक आहे. – संकलक) तुम्ही सर्व जण भाग्यवान जीव आहात; कारण तुम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरु लाभले.’’ हे सांगत असतांना त्यांची भावजागृती झाली. ते म्हणाले, ‘‘एका विवाहाच्या निमित्ताने माझा सनातन संस्थेशी संपर्क आला. मला ठाऊक होते की, एक गुरु केल्यावर दुसरे करू नयेत. त्यामुळे मी त्या बंधनात राहिलो आणि माझ्या मार्गाने साधना करत राहिलो. तेव्हा लगेचच प.पू. गुरुदेवांकडे आलो नाही.’’ हे सांगतांना आजोबा भावावस्थेतच होते.

कुणाचेही मार्गदर्शन नसतांना एकट्याने एवढी प्रगती केल्यामुळे प.पू. गुरुदेवांनी आजोबांचे कौतुक केले.’

– कु. मेघा चव्हाण, (२४.९.२०१७)

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट !

पवारआजोबांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीप्रमाणे ही भेट होत आहे’, असे मला वाटत होते.

६. गुरूंनी सांगितलेली कठीण साधनाही श्रद्धेने केल्यामुळे आजोबांना आंतरिक आनंद लाभणे

आजोबांना मुळातच मल्लखांब, व्यायाम, तसेच इतर शारीरिक कृती करण्याची आवड आहे. गुरूंनी त्यांना पतंजली योगमार्गातून साधना करायला सांगितल्यामुळे त्यांना आंतरिक आनंद लाभला. त्यांनी प.पू. टेके महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार पतंजली योगानुसार कठीण साधनाही श्रद्धेने केली. ते ध्यानसाधना करायचे. ‘शरीरमाद्यं खलुं धर्मसाधनम् ।’, म्हणजे ‘शरीर हेच धर्माचे साधन आहे’, या वचनावर त्यांची श्रद्धा आहे. आजही वयाच्या ९२ व्या वर्षी ते योगासने आणि लाठीकाठीचे प्रकार करतात.

श्री. आबा या वयातही अत्त्युत्तम योगासने करतात. तसेच  ते अनेकांना योगासने शिकवतातही. वयाच्या ९२ व्या वर्षीही साधना करण्यासाठी, योगासने शिकवण्यासाठी त्यांचा उत्साह टिकून आहे.

७. ध्यानसाधना करतांना आलेल्या अनुभूती

७ अ. समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर वेगळीच आनंदावस्था प्राप्त होऊन ‘सर्वत्र ब्रह्म आहे’, याची जाणीव होणे

ध्यानसाधना करतांना बर्‍याचदा त्यांची समाधी लागत असे. ते म्हणाले, ‘‘एकदा समाधीतून बाहेर आल्यावर मला एक वेगळीच आनंदावस्था प्राप्त झाली. त्या वेळी ‘मला सर्वत्र ब्रह्म आहे’, असेे जाणवून मी सर्वांना आलिंगन देऊ लागलो. एका लहान बाळाला आलिंगन दिल्यावर मला शीर्षासन करण्याची जाणीव झाली आणि तेे केल्यावर मी सामान्य स्थितीला आलो.’’

३ आ. ध्यानधारणा करतांना त्यांना अनेक वेळा दैवी नाद ऐकू आले आहेत, तसेच दैवी प्रकाशही दिसला आहे.

३ इ. अध्यात्मातील बरेच ज्ञान असणे

आजोबांचे व्यावहारिक शिक्षण अल्प असूनही त्यांना अध्यात्मातील बरेच ज्ञान आहे. त्यांनी बोलतांना कुंडलिनी शक्तीच्या मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करून सांगितले.

८. उन्नत साधक

आजोबा एक उन्नत साधक असल्याची खूण म्हणजे त्यांच्या मस्तकावर ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी एक छिद्र आहे.

९. प.पू. गुरुदेवांचा चरणस्पर्श  लाभलेल्या आजोबांचे कृतज्ञतापर बोल !

केवळ परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्यासाठी आजोबा रामनाथी आश्रमात आले. भेटीच्या वेळी त्यांनी गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. त्याचे वर्णन करतांना ते म्हणाले, ‘‘मला अनेक वेळा देवाचे दर्शन झाले; पण मी नेहमी देवाच्या स्पर्शापासून वंचित राहिलो होतो. प.पू. गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श केल्यावर ‘मला देवाचा स्पर्श कसा असतो’, याची जाणीव झाली आणि माझी इच्छापूर्ती झाली.’’

१०. साधकांना दिलेला संदेश !

आजोबा म्हणाले, ‘‘आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यांच्या अनुसंधानात रहाणे, यातच जीवनाचे सर्वस्व आहे. माझे गुरु मला सोडून गेले, त्या वेळी मला काहीच कळत नव्हते; परंतु तुम्हाला देहधारी गुरु आहेत, तर त्यांच्या अस्तित्वाचा लाभ करून घ्या. प्रत्येक गोष्टीचा आरंभ आणि अंत त्यांच्या स्मरणाने करा !’’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०१७)

 

श्री. शामराव पवारआजोबांना आलेल्या अनुभूती

आश्रमभेटीत श्री. पवारआजोबांनी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या, त्या पुढे देत आहे.

१. मंद प्रकाशात ज्योतीचे दर्शन होणे

‘एकदा मी ध्यानावस्थेत असतांना खोलीत मंद प्रकाश पडला होता. तिथे मला एक ज्योत दिसली’, असे पुन्हा घडले. मला ते स्वप्नाप्रमाणे वाटले.

२. एका अरण्यात २ देवतांनी स्वतःला ओवाळल्याचे दिसणे

‘एकदा मी एका अरण्यात गेलो होतो. तिथे प.पू. गुरुदेवांप्रमाणे काही लोक होते. तिथे २ देवता आल्या आणि त्यांनी मला, म्हणजे माझ्यातील जीवात्म्याला ओवाळले. त्यानंतर मी भानावर आलो.’

३. वेगवेगळ्या ठिकाणी एका सिद्ध पुरुषांशी भेट होऊन ते लगेचच अदृश्य झाल्याचे दिसणे

‘आतापर्यंत माझी वेगवेगळ्या ठिकाणी ५ – ६ सिद्ध पुरुषांशी भेट झाली. एकदा शेतात नांगरतांना बैल मागे फिरले तेव्हा, एकदा पत्नीसह सांगलीला जात असतांना वाटेत, गिरनार पर्वतावर गेलो असतांना आणि द्वारकेला गेलोे असतांना तिथे अष्टावक्राप्रमाणे एक व्यक्ती मला भेटली. या प्रत्येक ठिकाणी काही तरी अर्पण करावे; म्हणून मी खिशात हात घालून पहायचो, तोवर ती व्यक्ती समोरून अदृश्य झालेली असायची.’

– कु. मेघा चव्हाण

 

चुकीसाठी प्रायश्‍चित्त घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण करणारे श्री. शामराव विठ्ठल पवार (आबा) !

रामनाथी आश्रमात गेल्यावर माझ्याकडून एक चूक झाली होती. त्या चुकीसाठी मी आता प्रायश्‍चित्त घेण्याचे ठरवले आहे. कार्तिक वारीपासून प्रत्येक महिन्यात एक दिवस मी उपवास आणि मौन धारण करणार आहे, असे आबांनी या वेळी सांगितले.

रामनाथी आश्रमाविषयी बोलतांना श्री. शामराव विठ्ठल पवार (आबा) म्हणाले, ‘‘असा आश्रम मी यापूर्वी पाहिला नाही. शौचालयात उठतांना वयस्कर, अथवा रुग्णाइत साधकांना त्रास होऊ नये; म्हणून भिंतीला कड्या बसवण्यात आल्या आहेत. साधकांचा इतका विचार अन्य कुठेही केलेला नसेल.’’

 

आजोबांनी सांगितलेले काही शब्दांचे अर्थ !

१. आश्रम

जेथे सर्व श्रमरहित होते, तो म्हणजे आश्रम !

२. ज्ञान

‘ज्ञ’ म्हणजे जाणीव आणि ‘न’ म्हणजे नाही. ज्याला जाणीवरहित अवस्था प्राप्त होईल, तो म्हणजे ‘ज्ञानी’ !

साधकांनी नेहमी गुरूंना अपेक्षित अशी कृती केली पाहिजे ! – श्री. शामराव विठ्ठल पवार (आबा)

सत्कार झाल्यावर श्री. शामराव पवार (आबा) म्हणाले, ‘‘आपल्याला ईश्‍वराने जे शरीर दिले आहे त्याचा उपयोग आपण परमार्थाकरता केला पाहिजे. ज्या गुरूंच्या कृपेने आपल्याला सर्व मिळाले त्या गुरूंना अपेक्षित अशीच कृती साधकांनी नेहमी केली पाहिजे. जन्मभर ‘शेवटचा श्‍वास गोड व्हावा’ यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. गीता सांगतांना श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘मी सांगतो तसे कर’, असे सांगितले होते. त्यानुसार भगवंत जे जे सांगतो, ते आपण कृतीत आणले पाहिजे.’’

 

श्री. शामराव पवार (आबा) यांनी सांगितलेली काही सूत्रे..

१. मी शेतकरी असून मला सहा सिद्धांचे दर्शन झाले आहे. मला अनेक वेळा देवतांचे दर्शन झाले आहे.

२. मी रामनाथी आश्रमात सेवा करण्यासाठी गेलो होतो; तेथे उलट झाले. त्या सर्व साधकांनीच माझी सेवा केली.

३. अनाहत नादापासून सर्व प्रकारच्या अनुभूती मी घेतल्या आहेत. सध्या मला डाव्या कानात सोहम्, तर उजव्या कानात ‘ओम’चा ध्वनी ऐकायला येतो.

४. ध्यानाला बसतांना डोळे बंद केल्यावर अनेक वेळा प्रकाश दिसतो.

५. कुठेही न वाचता माझे मनाचे श्‍लोक आपोआप पाठ झाले आणि समर्थ रामदासस्वामी यांनीही मला दर्शन दिले आहे.

विशेष

१. श्री. शामराव (आबा) पवार हे त्यांच्या साधनेचा प्रवास वर्णन करतांना, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी, तसेच रामनाथी आश्रमाविषयी बोलतांना सतत सद्गदीत होत.

२. या वेळी आबांनी जिज्ञासेने पातळी कशी काढतात, हे विचारून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment