निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !

आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.

जिवंतिका पूजन

जिवंतिका पूजन ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे.

#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !

जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !

लवकर अन् शांत झोप लागण्यासाठी हे करा !

‘स्वरोदय शास्त्रा’नुसार चंद्रनाडीमध्ये अवरोध निर्माण केल्यास सूर्यनाडी जागृत होते आणि सूर्यनाडीमध्ये अवरोध निर्माण केल्यास चंद्रनाडी जागृत होते. याचाच प्रत्यय उजव्या कुशीवर झोपल्यावर डावीकडील चंद्रनाडी कार्यरत होणे आणि डाव्या कुशीवर झोपल्यावर उजवीकडील सूर्यनाडी कार्यरत होणे, यांमध्ये दिसून येतो.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य वस्त्र : धोतर

धोतर शक्यतो पांढर्‍या रंगाचे असते. हे नेहमी घालावयाचे वस्त्र आहे. मुख्यतः पूजाकर्म, धार्मिक कार्य इत्यादींच्या वेळी वापरत असलेल्या कौशेयाच्या (रेशमाच्या) वस्त्राला सोवळे असे म्हणतात.

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.

व्यायाम आणि योगासने यांचे मानवी जीवनातील महत्त्व !

‘व्यायाम आनंददायक आहे. शरिराच्या रचनेमध्ये आपले अवयव, स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या, त्वचा, मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू हे सर्व अंतर्भूत असतात. ‘शरीर सुदृढ असावे’, असे आपल्याला नेहमी वाटत असते; परंतु या सर्व अवयवांची कार्यक्षमता चांगली रहाण्यासाठी  व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाचे अनेक लाभ आहेत.

गुरुपौर्णिमेनिमित्त संत संदेश !

महर्षि व्यासांनी ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांमध्ये ज्या विराट आदिपुरुषाचे वर्णन केले आहे, तोच श्रीमन्नारायण आता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ हे नाव धारण करून पृथ्वीतलावर अवतरित झाला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेचे कार्य आरंभ केले आहे. या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून आम्हा साधकांची निवड केली.

पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !

आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.