गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा संदेश (2022)

देवाची कृपा संपादन करण्याचे प्रयत्न
वाढवा ! – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

सद्यःस्थितीत सामान्य व्यक्तीला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागत आहे. जीवन आनंदी होण्यासाठी व्यक्तीने साधना (ईश्वरप्राप्तीसाठी दैनंदिन करायचे प्रयत्न) करणे आवश्यक असते. सध्या नित्यसाधना करणे अवघड वाटत असले, तरी तुम्ही जेथे असाल, तेथे देवाचा नामजप करणे, देवाशी सतत बोलणे, देवाला अधिकाधिक प्रार्थना करणे वा शरण जाणे, प्रत्येक कृतीचे कर्तेपण देवाला अर्पण करणे इत्यादी कृती करा ! त्यामुळे तुमच्यावर ईश्वराची कृपा लवकर होईल. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘माझी प्रत्येक कृती देवाची कृपा मिळण्यासाठी घडू दे’, अशी प्रार्थना करा !

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

धर्मसंस्थापनेसाठी स्वक्षमतेनुसार योगदान द्या !
– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

शिष्याने श्री गुरूंना अपेक्षित धर्मकार्य करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. सध्याचा काळ धर्मसंस्थापनेसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनुकूल आहे. या काळात समाजाला हिंदु धर्माच्या संदर्भात जागृत करणे आणि धर्माच्या रक्षणासाठी कृतीशील योगदान देणे, यांसाठी प्रत्येकाने स्वक्षमतेनुसार योगदान देणे, हेही एक प्रकारचे गुरुकार्य ठरते. अगदी कोणतेही कार्य करण्याची क्षमता नसलेली व्यक्तीही प्रतिदिन देवतांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून या कार्यात योगदान देऊ शकते. या गुरुपौर्णिमेपासून धर्मसंस्थापनेसाठी म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वक्षमतेनुसार अधिकाधिक योगदान देण्याचा निश्चय करा !

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment