#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.
आपण ज्याला ‘गुढी’ म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ‘ब्रह्मध्वज’ आहे. त्यामुळे ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे. ‘गुढी’ हा शब्द संस्कृत नाही, तर ‘पाडवा’ प्रतिपदेचा अपभ्रंश आहे.
पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी सनातन संस्थेच्या प्रसिद्धी फलकावर शुभेच्छापर लिखाण कसे करावे हे पाहूया.
आमचे प्रत्येक पाऊल हे आजपासून प्रगतीपथावर, जीवनसमृद्धीसाठी पडावे; म्हणून आजच्या दिवशी आमच्या जीवनाला फलदायी होईल, असा शुभ संकल्प करावयाचा.
गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या
प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्या विष्णूची पूजा करतात.