साधकांनो, उपाय गांभीर्याने करा !
माझा महामृत्यूयोग, साधकांना होणारे त्रास, हिंदु राष्ट्राची स्थापना यांसंदर्भात विविध संतांनी सांगितलेले सर्व उपाय मी करतो. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (१७.६.२०१३)
माझा महामृत्यूयोग, साधकांना होणारे त्रास, हिंदु राष्ट्राची स्थापना यांसंदर्भात विविध संतांनी सांगितलेले सर्व उपाय मी करतो. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (१७.६.२०१३)
आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे … Read more
शिरस्त्राण, चिलखत इत्यादी स्थुलातून आक्रमण झाल्यास त्या त्या भागाचे रक्षण करतात. साधनेमुळे संरक्षककवच निर्माण होते. ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरच्या आक्रमणांपासून पूर्ण देहाचे आणि मनाचे रक्षण करते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))
साधनेत तन-मन-धनाचा त्याग केला की झाले, असे बर्याच ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना आणि काही संतांनाही वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, साधनेत पुढे जायची तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती आणि समष्टीतील नेतृत्व इत्यादी गुणही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय पुढील प्रगती होणे अशक्य आहे. एवढेच नव्हे, तर या गुणांशिवाय अधोगतीही होऊ शकते. – डॉ. … Read more
‘काही जणांकडे ३-४ पिढ्यांपूर्वीचीही देवघरातील देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती पूजेत ठेवलेली असतात. चित्रे आणि मूर्ती जुनी झाल्यामुळे त्यांच्यातील देवतेचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अल्प झालेली असते. एवढेच नव्हे, तर काही वेळा त्यांतून त्रासदायक स्पंदनेही प्रक्षेपित होतात. भावनाप्रधानतेमुळे अशी चित्रे आणि मूर्ती देवघरात ठेवण्यात येतात. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरातील मूर्तीचीही … Read more
आपण नेहमी बोलतो, त्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात. साधनेत नामजप करतांना वैखरीतून मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींत जप करत करत पुढे जायचे असते. हे साध्य करणे सुरुवातीला कठीण असते. तेव्हा वैखरी वाणीत जप करतांना जप ऐकू येत असल्यामुळे जपावर मन एकाग्र व्हायला साहाय्य होते. त्यामुळे पुढच्या वाणींतील जप करणे सुलभ होते. – डॉ. आठवले … Read more
‘सनातन प्रभातमध्ये दृश्य जगाबरोबर अदृश्य (सूक्ष्म) जगाबद्दलही माहिती देण्यात येते; कारण दृश्य जगातील घटनांसाठी अदृश्य जगातील घटना कारणीभूत असतात व ‘दृश्य जग सुखी करायचे असेल, तर अदृश्य जगातील घटनांबद्दल उपाय केले पाहिजेत’, याची जाणीव मानवाला व्हावी.’ – डॉ. आठवले (२६.५.२००७, दुपारी १२.०५ )
नरसिंहाचे रूप पाहून कोणालाही भीती वाटेल आणि तो दूर पळेल; पण छोटा प्रल्हाद भक्त असल्यामुळे चराचरात श्रीविष्णुला पहात होता. त्यामुळे तो नरसिंहाला घाबरला नाही. यावरून लक्षात येते की, प्रल्हादासारखी भक्ती केली, तरच भगवंत आपल्यालाही वाचवील. – डॉ. आठवले (१७.२.२०१४)
एखाद्या कुटुंबात फक्त नवरा-बायको असले, तरी त्यांची आपसात भांडणे होतात. एकत्र कुटुंबात २० – २५ जण असले, तरी भांडणे होतात; मात्र सनातनच्या देवद आणि रामनाथी येथील आश्रमांत शेकडो साधक एकत्र रहात असूनही त्यांच्यात भांडणे होत नाहीत. यावरून साधनेचे महत्त्व लक्षात येते. – डॉ. आठवले (२०.२.२०१४)
१. ‘विज्ञान मानवाला सुखलोलूप बनवते आणि मायेत अधिकाधिक अडकवते, तर अध्यात्म सुखाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देते, म्हणजेच त्याची मायेपासून सुटका करते. २. विज्ञान बुद्धीचा अहंकार वाढवते, तर अध्यात्म बुद्धीलय आणि अहंलय करण्यासाठीची साधना शिकवते.’ – डॉ. आठवले (पौष शुक्ल पक्ष ९, कलियुग वर्ष ५११४ (२०.१.२०१३))