अध्यात्माचे अर्धवट ज्ञान असल्यास होणारी हानी

१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, … Read more

अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून २५ वर्षे व्यवसाय केला. संमोहन उपचारशास्त्र मानसोपचाराच्या अंतर्गत येते. या उपचाराच्या पद्धतीत संशोधन केल्यामुळे माझे विदेशांत कौतुक झाले. मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणही आले होते. अशी पार्श्‍वभूमी असतांनाही मी बरे करू शकत नसलेले रुग्ण संतांच्या उपचारांनी बरे होतात, हे मी अनुभवले. नंतर मी संतांकडून त्यांची उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे … Read more

खरा आनंद

आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडीत नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडीत असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. … Read more

कर्तव्य

आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

श्रद्धेचे महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

समष्टी साधना करतांना संचित आणि प्रारब्ध नष्ट कसे होते?

समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)

प्रल्हादाच्या भक्तीचा उगम त्याच्या जन्मापूर्वीच्या संस्कारांत असणे

१. एकदा हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी वनात गेला होता. तेव्हा बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन नारायण नारायण असे म्हणत त्याचा तपोभंग केला. हिरण्यकश्यपू रागावून घरी आला. पत्नी कयाधूने विचारले, पोपट काय म्हणत होता ? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. तिने पुनःपुन्हा तेच विचारले. तेव्हा हिरण्यकश्यपूचा १०८ वेळा नारायण नारायण असा जप झाला. त्या रात्री संभोग होऊन कयाधूला गर्भधारणा … Read more

चेहरा हसरा ठेवायला शिका आणि स्वतःला आणि इतरांना आनंद द्या !

देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, … Read more

उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही !

उपाय म्हणून औषधे घेतल्यास त्यांचा कधी दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो; पण उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही ! – डॉ. आठवले (१८.६.२०१४)

कलेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे !

कलाकाराने एखादी अप्रतीम कलाकृती कोणाला दाखवली, तर ती पहाणार्‍याला केवळ व्यक्तीगत सुख देते. ती पहाणार्‍याला काही शिकवू शकत नाही. याउलट एखाद्याला अध्यात्म विषयक काही सांगितले, तर त्याला आनंद मिळतो आणि ते ज्ञान इतरांना देऊन तो इतरांनाही आनंदी करू शकतो. याचा अर्थ हा की, कला व्यष्टी साधनेत साहाय्य करते, तर ज्ञान समष्टी साधनेसाठी उपयुक्त आहे. – … Read more