भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार !

‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो !

‘खरा ज्ञानी हा अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

जिज्ञासू

जिज्ञासूपणा असणे, म्हणजे आपल्यामध्ये नवनवीन शिकण्याची वृत्ती असणे. प्रत्येक गोष्टीतील नाविन्यता साधना करण्यात आपला उत्साह वाढवते. उत्साहामुळे नवनवीन शिकण्याची वृत्ती जागृत राहिल्याने आपला आनंदही टिकून रहातो. याच आनंदात ईश्वराची प्रसन्नता असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)

ईश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाचा गुरूंनी सांगितलेली सेवा झोकून देऊन करतांना कितीही संघर्ष झाला, तरीही त्याने तो सहन करणे आवश्यक !

‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. … Read more

आध्यात्मिक स्तराचे महत्त्व

१. ‘उच्च आध्यात्मिक स्तर असला की, रज-तम यांचा परिणाम होत नाही. याउलट उच्च आध्यात्मिक स्तरामुळे निर्माण झालेल्या चैतन्याचा रज-तम यांच्यावरच परिणाम होतो आणि रज-तम अल्प होतात. २. आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात. ३. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांच्या पुढे पोचली, म्हणजे जीव संतपदाला पोचला की, त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवच … Read more

काळानुसार ‘उत्तम कर्म’ हेच ‘उत्तम ध्यान’ असणे

‘काळानुसार ‘उत्तम कर्म’ करणे, हेच सध्याच्या घडीला ‘उत्तम ध्यान’ आहे. केवळ ध्यानाने प्रगती होत नाही; कारण ध्यान लागण्याएवढी सात्त्विकता आपल्यात नसते. ती उत्तम कर्म करून मिळवावी लागते. उत्तम आचरण, उत्तम विचार आणि देवाचे उत्तम अनुसंधान यांमुळे देह सात्त्विक होऊ लागतो. असा देहच ‘उत्तम ध्यान’ करू शकतो.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. … Read more

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढणे आणि याउलट संत कृती करून दाखवत असल्याने ते साधकांना अधिक प्रिय असणे

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढू शकतो. त्यामुळे बरेच प्रवचनकार, कीर्तनकार आणि सत्संग घेणारे यांच्यामध्ये अध्यात्म कृतीत न आणल्याने ज्ञानाचा तीव्र अहं निर्माण होतो. ते आयुष्यभर लोकांना ज्ञान सांगतात; पण स्वतः त्याला अनुसरून कृती करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. याउलट संतांचे असते. संत अल्प … Read more

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘सत्ययुगात पृथ्वीवरील सर्वच लोक साधना करणारे असल्याने ते सात्त्विक होते. मृत्यूनंतर त्यांचे प्रेतही सात्त्विक असे. अशा साधना करणार्‍या आणि सोहम्भावातील जिवाला काशीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्नी दिल्यावर स्वतः शिव त्या जिवाच्या कानात ‘मुक्तीमंत्र’ सांगून त्याला मुक्ती देत असे. आता कलियुगात हा नियम लागू नाही; कारण आताचा मनुष्य सोहम्भावापासून पुष्कळ दूर आहे. देव न मानणार्‍या, देवाच्या कार्याला … Read more