‘समजून घेणे आणि सांभाळून घेणे’, म्हणजे साधना !

‘समजून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून घेणे’ आणि ‘सांभाळून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून स्वतः तसे जगणे अन् इतरांनाही आध्यात्मिक आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणे.’ -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भगवंताच्या अनुसंधानामुळे मन तणावमुक्त आणि शांत होणे

भगवंताचे अनुसंधान मनुष्याला तणावमुक्त करते. तणावमुक्त मन हे शांतीचे माहेरघरच असते. शांतीच्या स्पर्शामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते. योग्यांचे असेच असते. सर्वसामान्य मनुष्यापेक्षा योग्यांच्या दोन श्‍वासांतील अंतर अधिक असते. त्यामुळे योग्यांचे आयुष्यमान इतरांपेक्षा अधिक असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

देहात ‘मनमंदिर’ निर्माण करणे

मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

साधनेच्या प्रवासात अखंड सावधानता असणे आवश्यक आहे

१. महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाही साधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे ​ ‘एकदा एका नाडीपट्टीवाचनामध्ये महर्षींनी साधकांना उद्देशून सांगितले, ‘‘साधकांची देवावरील श्रद्धा अजून वाढायला हवी.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या आपत्काळातही तीव्र त्रासांमध्ये माझे साधक … Read more

साधनेत आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यासाठी ‘सेवा परिपूर्ण करणे’ अतिशय महत्त्वाचे आहे !

रामनाथी आश्रमात नामजपादी उपाय करण्यासाठी, तसेच एका हवन विधीची सिद्धता म्हणून एका पुरोहितांनी सांगितलेले महत्त्वाचे पूजा साहित्य एका साधकाने खोक्यातून चेन्नईहून रामनाथी आश्रमात पाठवले होते. हे साहित्य पाठवल्यावर त्याचा योग्य तो पाठपुरावा संबंधित साधकाकडून घेतला गेला नाही. तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेत परिपूर्ण सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपण जी सेवा करतो, त्या … Read more

दुःख कुणीही पचवू शकणे; मात्र कौतुक पचवता न येणे आणि ते केवळ गुरुकृपेनेच शक्य होणे !​

कष्ट सहन करून दु:खाला सामोरे जाता येऊ शकते; पण जेव्हा आपले कौतुक होते, तेव्हा मात्र जिवाचे कर्तेपण वाढून ‘अहं’ जोपासला जाऊ शकतो. हा ‘अहं’ आपल्याला पुन्हा अधोगतीकडे नेण्यास कारण ठरतो. श्री गुरु साधकाला याची वेळोवेळी जाणीवही करून देतात आणि साधकाला ‘अहं’चा बळी होण्यापासून वाचवतात. दुःख असो वा कौतुक या दोन्ही गोष्टी मायेतील मृगजळासमानच आहेत. श्री … Read more

चराचरातील गुरुतत्त्व पहाता आल्याने सतत शिष्यभावात रहाता येऊन चिरंतन आनंदाकडे वाटचाल करता येणे, म्हणजेच ‘गुरुकृपा’ होणे !

‘सतत इतरांकडून शिकणे, म्हणजे अखंड ‘शिष्यभावात’ रहाणे. यामुळे चराचरात प्रत्येक ठिकाणी गुरुतत्त्वाला पहाणे शक्य होते. शिष्यभाव साधकाला श्री गुरूंच्या देहापलीकडे असलेल्या चैतन्याची जाणीव करून देतो. प्रत्येकालाच ‘गुरु’ या भावाने पाहिल्याने साधकाला कुणाविषयी प्रतिक्रिया येत नाहीत. त्यामुळे त्याच्या अपेक्षा संपतात आणि आपोआपच त्याचे मायेत अडकणेही संपते. मायाच संपुष्टात आल्याने साधकाला चिरंतन अशा शाश्‍वत आनंदाच्या दिशेने वाटचाल … Read more

बोलतांना वाणीही शिष्यभावात म्हणजे नम्र असण्याचे महत्त्व !

१. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असल्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे ! : ‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते. त्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे. कुणालाही वावगे बोलू नये. तोंडातून अपशब्द काढू नयेत. २. शब्द … Read more

गुरूंना आवडणारी खरी गुरुदक्षिणा कोणती ?

ज्या गुरूंनी जन्मोजन्मी आपल्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्यांना ‘स्वतः उत्तम शिष्य बनून दाखवणे’, हीच खरी त्यांना आवडणारी गुुरुदक्षिणा असणे ‘आतापर्यंत गुरूंनी आपल्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. ‘आपल्या अनेक पूर्वजन्मांमध्ये गुरूंनी आपल्याला कसे सांभाळले असेल ?’, याविषयी कल्पना करणेही कठीण आहे. त्यांनीच आपल्याला जीवनात क्षणोक्षणी सावरले आहे. त्यांच्या अनंत जन्मांच्या कृपेमुळेच आज आपण या देवमार्गाला लागलो … Read more

मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित संगमाने केलेली सेवा ‘परिपूर्ण सेवा’ होऊन आनंद मिळताे

‘आपण तत्त्वरूपाने जे शिकलो, ते आता कृतीत आणणे आवश्यक आहे. केवळ शिकण्यातून मन सकारात्मक बनते; परंतु शिकलेले प्रत्यक्ष कृतीत आणले, तर बुद्धीही मनासोबत सेवा करू लागते. ‘मन आणि बुद्धी’ यांच्या एकत्रित संगमाने निर्माण झालेली ऊर्जा तुम्हाला सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळवून देते. यालाच ‘परिपूर्ण सेवा करणे’, असे म्हणतात. परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार अंगी बाणवला असता ‘मन … Read more