हिंदुत्व जोपासणे म्हणजे काय ?
‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
केवळ कृती करणे, म्हणजे माया आणि प्रत्येक कृतीला सात्त्विकतेची जोड देणे, म्हणजे अध्यात्म ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
साधकाची जसजशी आध्यात्मिक प्रगती होते, तसतसे त्याच्या जीवनातील सर्वकाही देवाशी जोडले जाऊ लागते. ‘देव एके देव’ एवढेच शेष रहाते. बहुतेक लोक विचारांच्या पातळीला बराच काळ रहातात. त्यांच्याकडून साधनेची कृती होत नाही. केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, … Read more
‘तुमच्या देहाचे मडके अध्यात्मात एकदा चांगले सिद्ध झाल्यावर तुम्ही कधीही, कुठेही गेलात, तरी ते फुटत नाही; उलट ते चांगला नाद निर्माण करते. श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘वर्तमान स्थितीत समोर येईल, त्या देवाच्या तत्त्वांशी एकरूप होता आले पाहिजे. त्या वेळी समोर दिसणार्या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते आणि मग सर्वव्यापी असणार्या भगवंताशी एकरूप होता येते. काही जणांमध्ये सांप्रदायिकतेमुळे देवाच्या एकाच तत्त्वाविषयी भाव असतो, उदा. काहींना श्रीराम जवळचा वाटतो; परंतु हनुमंत नाही. … Read more
‘व्यष्टी साधना करतांना देवाचा आशीर्वाद मिळतो; मात्र समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते. समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘समष्टी सेवेमुळे भगवंताच्या निर्गुण निराकार तत्त्वाशी शीघ्रतेने एकरूप होता येते; कारण समष्टी सेवा करतांना आपल्या इच्छा सोडून इतरांची इच्छापूर्ती होण्यासाठी जगावे लागते. यातून अहं लवकर अल्प होतो. त्यामुळे देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होतो.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘नामाच्याही पुढे केवळ एकच ध्यास उरतो, तो म्हणजे ईश्वरप्राप्तीचा ! ईश्वरालाच ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘ब्रह्म’ एकच आणि अविनाशी आहे. भक्ताच्या या अवस्थेत देवच भक्ताचे नाम घेण्याचे कार्य करतो. आधी भक्त देवाची सेवा करतो आणि नंतर देवच भक्ताची सेवा करू लागतो.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘भगवंत किंवा गुरु यांची सेवा करणे’, हेच आयुष्यातील आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे संकुचित वृत्ती सुटते आणि समाजाच्या कल्याणाचा विचार होऊ लागतो. व्यापक संकल्पना मनात आणल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही; कारण भगवंत व्यापक आहे. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
१. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्या व्यक्तीला दायित्व … Read more