कीर्तनकार आणि गुरु यांच्यातील भेद !
‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अनेक शारीरिक आजार हे शरिराच्या प्राणशक्तीमध्ये अडथळे आल्यामुळे निर्माण झालेले असतात. प्राणशक्तीमधील हे अडथळे विविध न्यास, मुद्रा आणि त्यांच्या जोडीला योग्य त्या देवतेचा नामजप यांनी दूर करता येतात. ही बिनखर्चिक उपचारपद्धती आत्मसात केल्यास ‘आपले आयुष्य आपल्याच हातात असते’, याची अनुभूती येते. अनेक आजारांसाठी औषधोपचारासह या पद्धतीने उपचार केल्यास अल्पावधीत आजार बरे होतात. सनातनचे अनेक साधक … Read more
‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
‘अध्यात्मात साधनेचा आरंभ, म्हणजे ‘अ’ (A) असे काही नसते. ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे आणि साधनामार्गाप्रमाणे प्रत्येकाच्या साधनेचा आरंभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१२.२०२१)
‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सात्त्विक जागा, उदा. देवाचे स्थळ अशा ठिकाणी चुकून पाय लागल्यास, त्या चैतन्यदायी जागेला आपला पाय लागला; म्हणून आपल्याला वाईट वाटते. असे असले, तरी त्या चैतन्यदायी जागेच्या स्पर्शाने आपल्या देहात तेथील देवतेचे तत्त्व संक्रमित होते. हा त्याचा लाभही आहे. असे असले, तरी मुद्दामहून पाय लावू नये. त्यामुळे अधिक हानी होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१.२०२२)
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले