सात्त्विक व्यक्तींचे ध्येय !
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात. कलियुगात स्वभावदोष अनेक असल्याने आधी ते दूर करावे लागतात. मगच साधना करता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.६.२०२१)
‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ? हे सांगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित विद्वान, हे लक्षात घेत नाहीत की, ऋषी-मुनींनी सांगितलेले सत्य चिरंतन आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न तथाकथित विद्वानांनी केला पाहिजे. त्यामुळे ‘मनूचे मत’ असे न म्हणता ‘मनूने सांगितलेले शास्त्र’ असे म्हटले पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ईश्वरी योजनेनुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. संत आणि द्रष्टेपुरुष यांनाही त्याचे वेध लागले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर गोप-गोपींनी ज्याप्रमाणे स्वतःचे कर्तव्य म्हणून त्यांच्या काठ्या गोवर्धन पर्वताला लावल्या, त्याप्रमाणे आपल्यालाही आपले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कर्तव्य बजावायचे आहे. आपण साधना म्हणून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासमवेत … Read more
‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसमवेत तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही. यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या (सनातन … Read more