बालपणी सुसंस्कार आणि सद्गुण यांचा लाभलेला ठेवा, तसेच सनातन संस्थेने सांगितलेली साधना यांमुळे ‘आंतरिक पालट कसा घडला’, हे सांगणारा जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा साधनाप्रवास !

माझ्या बालपणी आमच्या घरी एकत्र कुटुंबपद्धत होती. माझ्या माहेरच्या सर्व व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने घरात प्रतिदिन पूजापाठ, मंदिरात जाणे, स्तोत्रपठण करणे आदी गोष्टी केल्या जात.

भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ !

भारतीय रुपयाप्रमाणे त्यावर महात्मा गांधींचे चित्र नाही किंवा कोण्या नेपाळी राजकारण्याचे चित्र नाही. या नोटेवर हिमालयाचे चित्र आहे.

स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांचा विसर पडलेला समाज अन् संस्कृतीजतन आणि धर्माचरण यांस उद्युक्त करण्यासाठी प्रयत्नरत सनातन संस्था !

सध्याच्या काळात समाजातील सात्त्विकता पुष्कळच उणावली असून साधना करणे कठीण झाले आहे. समाजाला अध्यात्माचे महत्त्व सांगून समाज साधनेकडे वळावा आणि समाजातील सात्त्विकता पुनर्प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनचे साधक अन् संत प्रयत्न करत आहेत.

श्री भवानी देवीचा नामजप कसा करावा ?

श्री भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून आेळखली जाते. महाराष्ट्रातील धाराशिव या जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री भवानी देवीचे स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक पीठ आहे.

सनातन संस्थेच्या वतीने ठाणे आणि बदलापूर येथे ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर प्रवचन !

डीजेवर चित्रपटांची गाणी लावून मद्य पिऊन धांगडधिंगा करत मिरवणुका काढणे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक म्हणून बसवणे, मूर्तीदान करणे, जागरणाच्या नावाखाली जुगार खेळणे यांसारख्या अनेक विकृतींमुळे पावित्र्य भंग होत आहे.

वयाचे बंधन झुगारून देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करणारे मध्यप्रदेशातील दुर्ग येथील सनातनचे १८ वे संतरत्न पू. चत्तरसिंग इंगळे (वय ८८ वर्षे) !

मध्यप्रदेशातील दुर्ग या ठिकाणी मार्गदर्शनासाठी कोणी नसतांनाही पू. छत्तरसिंग इंगळे यांनी साधना करून संतपद गाठले आणि त्यानंतरही प्रगती चालूच ठेवली आहे. हे मार्गदर्शनासाठी कोणी नसलेल्या सर्वच साधकांना दिशादर्शक आहे

भादरा (हनुमानगढ, राजस्थान) येथील पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

भादरा (हनुमानगढ, राजस्थान) येथील अखिल भारतवर्षिय धर्मसंघ एवं करपात्री फाऊंडेशनचे उत्तराधिकारी पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांनी २५ सप्टेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवात प्रवचने, फ्लेक्स, ग्रंथ प्रदर्शन आदींच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !

गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक ठिकाणी हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स, प्रवचने, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

नाशिक येथील तापी नदीत फेकलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत पूजन करून विसर्जन

घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी तापी नदीत पूजेच्या सामानाची स्वच्छता करून फेकलेल्या गणेशमूर्ती उचलून पाण्याच्या डोहात त्याचे विधिवत पूजन अन् विसर्जन केले. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने आरती करण्यात आली.

सनातन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन

दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम राबवण्यात आली.