मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवात प्रवचने, फ्लेक्स, ग्रंथ प्रदर्शन आदींच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !

गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक ठिकाणी हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स, प्रवचने, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

 

नायगाव

येथील वक्रतुंड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे सनातन संस्थेच्या सौ. उर्मिला खानविलकर यांनी ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश नाईक यांनी याचे आयोजन केले होते.

क्षणचित्रे

१. मंडळाच्या वतीने भाविकांना सनातनने प्रकाशित केलेल्या ‘गणपति अथर्वशीर्ष’ या लघुग्रंथाच्या ५० प्रतींचे वाटप करण्यात आले.

२. जिज्ञासूंनी गणपतीचा नामजप घरीही करणार असल्याचे सांगितले.

 

नालासोपारा

ओम साई युवा मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे सनातन संस्थेच्या सौ. जयश्री अहिरराव यांनी ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर मार्गदर्शन केले. ३६ जणांनी हा विषय ऐकला.

 

गोरेगाव

जय अंबे मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सनातन संस्थेचे ‘अध्यात्म’ या विषयावरील फ्लेक्स लावले होते. मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज जैस्वाल यांचे यासाठी सहकार्य लाभले. त्यांनी धर्मकार्यात जमेल तसे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

गणेशभक्त श्री. रवींद्र गद्रे यांच्या घरगुती गणेशोत्सवात श्री. भरत कडूकर यांनी ‘श्री गणपति’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कौतुकास्पद असून यापुढे असे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करू’, असे श्री. गद्रे म्हणाले.

 

बोरीवली

सावरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या श्री. प्रसाद काळे यांनी ‘आदर्श गणेशोत्सव आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ४० गणेशभक्तांनी याचा लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. ‘चांगली माहिती मिळाली’, असे मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन तळवडकर म्हणाले.

२. समितीचे श्री. प्रसाद काळे यांना श्रीफळ आणि मोगर्‍याचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

धारावी

धारेश्‍वर गणेशोत्सव मंडळ येथे ‘साधना आणि धर्मावरील आघात’ या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ४० गणेशभक्त उपस्थित होते. काही भक्तांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.

घाटकोपर, मुलुंड, तसेच पवई येथील एकूण नऊ गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘श्री गणपति’, तसेच ‘स्व संरक्षण आणि प्रथमोपचार काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, तर भांडुप येथील दोन गणेशोत्सव मंडळात ‘श्री गणपति’ ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

क्षणचित्र – शासकीय वसाहत गणेशोत्सव मंडळाने धर्मशिक्षण वर्गाची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment