सनातन संस्थेच्या वतीने ठाणे आणि बदलापूर येथे ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर प्रवचन !

शास्रानुसार शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवणे आणि प्रबोधन करणे याची आज आवश्यकता ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांचे मार्गदर्शन ऐकतांना जिज्ञासू

ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या काळानुरूप उत्सवात पालट केले जात असल्याने उत्सवाचे पावित्र्यच नष्ट होत आहे. डीजेवर चित्रपटांची गाणी लावून मद्य पिऊन धांगडधिंगा करत मिरवणुका काढणे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक म्हणून बसवणे, मूर्तीदान करणे, जागरणाच्या नावाखाली जुगार खेळणे यांसारख्या अनेक विकृतींमुळे पावित्र्य भंग होत आहे. या विकृती नष्ट करून शास्रानुसार शाडूमातीची गणेशमूर्ती बसवणे आणि प्रबोधन करणे ही आजच्या उत्सवाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी येथे केले. या मार्गदर्शनाचा लाभ ३५ दुर्गप्रेमींनी घेतला.

बदलापूर येथेही ३ धर्मप्रेमींच्या घरी प्रवचन घेण्यात आले. बदलापूर येथील कीर्तनकार श्रीमती चंद्रात्रय यांनी सनातन संस्थेच्या बाजूने प्रतिक्रिया दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment