चिंचवड येथील पू. (श्रीमती) माया गोखलेआजी संतपदी विराजमान !

वयाचे बंधन न ठेवता श्रीमती माया गोखलेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, अशी घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली.

अंतर्मनातून साधना करणार्‍या आणि देवाशी अनुसंधान असणार्‍या पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी !

पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी घरी राहून व्यष्टी साधना, तसेच आश्रमासाठी पायपोस शिवण्याची सेवा करायच्या. त्यांचे अंतर्मनातून ईश्वराशी अखंड अनुसंधान होते.

वात्सल्यभाव, सेवाभाव आणि गुरूंप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

पू. उमाक्कांनी माझ्या मनातले ओळखून मला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे परिस्थितीकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच पालटला. त्या दिवसापासून पू. उमाक्कांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनात साठवली जाते.

निरपेक्ष प्रीतीमुळे सतत इतरांचा विचार करणारे आणि प्रत्येक कृती सुंदर अन् आदर्श रितीने करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

पू. संदीपदादांचे बोलणे अत्यंत शांत, नम्र आणि हळू आवाजात असल्याने ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते. पू. दादा करत असलेली प्रार्थना ‘ऐकतच रहावी’, असे वाटते.

शारीरिक त्रास असूनही वयाच्या ७८ व्या वर्षी तळमळीने सेवा करणारे सनातनचे २८ वे संत पू. सुदामराव शेंडे !

वृद्धावस्था आणि अनेक व्याधी असूनही पू. आजोबा कधी विश्रांती घेत नाहीत. कधी कधी ते रुग्णाईत असतात. तेव्हा त्यांना चक्कर येत असते, तसेच त्यांना उभे रहाणे आणि सेवेला जाणे अशक्य असते. तेव्हा ते खोलीत बसून सेवा करतात.

श्रीमती पार्वती ननावरेआजी (वय ७४ वर्षे) आणि श्रीमती माया गोखलेआजी (वय ७४ वर्षे) बनल्या सनातनच्या अनुक्रमे ८० व्या आणि ८१ व्या संत !

पुणे येथील श्रीमती पार्वती ननावरेआजी (वय ७४ वर्षे) आणि चिंचवड येथील श्रीमती माया गोखलेआजी (वय ७४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या अनुक्रमे ८० व्या आणि८१ व्या संतपदी विराजमान झाल्या.

‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥’ या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांना सर्वथा घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे पू. सौरभदादांना (पू. सौरभ जोशी यांना) क्षणोक्षणी कसे घडवत आहेत’, हे मी गेली २२ वर्षे अनुभवत आहे. यासाठी त्यांच्या चरणी प्रत्येक श्वासासहित कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल.

प्रेमळ अन् शांत स्वभाव असलेले चिपळूण येथील श्री. श्रीकृष्ण आगवेकर ७९ व्या संतपदी विराजमान !

उतारवयातही सेवा करणारे चिपळूण येथील साधक श्री. श्रीकृष्ण आगवेकर (वय ८२ वर्षे) हे सनातनच्या ७९ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २९ जुलै या दिवशी चिपळूण येथे झालेल्या भावसोहळ्यांत दिली.

तळमळीने सेवा करणारे राजापूर येथील श्री. चंद्रसेन मयेकर (वय ८० वर्षे) सनातनच्या ७८ व्या संतपदी विराजमान !

मला गुरुदेवांनी चरणांजवळ घेतल्यामुळे देवतांचे दर्शन झाले. गुरूंनी मला भरभरून प्रेम दिले.

परिस्थितीला धैर्याने तोंड देणार्‍या, सतत इतरांसाठी झटणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सनातनच्या पुणे येथील ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

पहाटे ३.३० – ४ वाजता उठून पू. आजी जप करतात. असे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अखंड चालू आहे. दिवसभरातही अधिकाधिक जप करण्यावर त्यांचा भर असतो.