नाशिक येथील तापी नदीत फेकलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत पूजन करून विसर्जन

चोपडा – चोपडा शहरात पाचव्या दिवशी झालेल्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर अनेकांनी मूर्ती तशाच फेकून दिल्या होत्या. घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी तापी नदीत पूजेच्या सामानाची स्वच्छता करून फेकलेल्या गणेशमूर्ती उचलून पाण्याच्या डोहात त्याचे विधिवत पूजन अन् विसर्जन केले. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने आरती करण्यात आली.

या वेळी घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, बापू चौधरी, सूतगिरणी संचालक शशिकांत पाटील, दोडे गुर्जर संस्थान संचालक प्रवीण रमेश पाटील, सागर बडगुजर, सागर पठार, नितीन निकम, वेले येथील विनोद पाटील, दीपक पाटील, बादल बडगुजर, राजेंद्र भाटिया, पंकज सपकाळे, संजय बिर्‍हाडे, पंकज सोनवणे, परेश बाविस्कर, सनातन संस्थेचे भगतसिंग पाटील, यशवंत चौधरी, किशोर दुसाने, अनिल पाटील, तुषार सूर्यवंशी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. तहसीलदार दीपक गिरासे आणि घनश्याम अग्रवाल यांनीही कामाचे कौतुक केले. प्रवीण पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment