मी… सनातनचे ग्रंथविश्‍व… परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मदूत !

शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार आणि कार्यासाठी दिलेले आशीर्वाद

प.पू. भक्तराज महाराज यांनी मला वर्ष १९९२ ते १९९५ या काळात धर्मप्रसार करण्याचा आशीर्वाद दिला. प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढतच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्य !

१. स्वतः वेशभूषेत न अडकणे आणि साधकांनाही त्यात न अडकवणे अन्य संप्रदाय किंवा संत यांच्याकडे वेशभूषेच्या संदर्भात काही नियमावली असते. काही ठिकाणी भगवे वस्त्र धारण करणे आवश्यक असते, काही ठिकाणी धोतर अनिवार्य असते. प.पू. डॉक्टर मात्र कुठल्याही वेशभूषेत अडकले नाहीत आणि त्यांनी साधकांनाही अडकवले नाही. हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा करावी, अशी त्यांनी शिकवण दिली; मात्र त्याचा … Read more

बाह्य अवडंबरात धन्यता मानणारे अन्य संत आणि बाह्य अवडंबरात न अडकता साधकांच्या उद्धारासाठी झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सिंहस्थ पर्वात काही साधू-संतांचे जे काही स्थूल निरीक्षण झाले, त्यातून परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या संदर्भात लक्षात आलेल्या वेगळेपणाची ठळक सूत्रे येथे मांडत आहे. या स्थुलातील सूत्रांतूनही प.पू. गुरुदेव असाधारण आहेत, हे स्पष्ट होते.

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

भोपाळ येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आदर्श जीवन पद्धती !

प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात.

ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !

गुरूंच्या विविध प्रकारांप्रमाणे प.पू. डॉक्टरांमध्ये दिसलेली विविध रूपे !

प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मात्र महर्षींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा वाढदिवस १०.५.२०१५ या दिवशी साजरा करण्यात आला.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि सप्तर्षि जीवनाडीपट्टी यांच्या आगमनाप्रसंगीच्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

२६ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता ५ सप्तर्षि जीवनाडीपट्ट्या आणि वज्र घेऊन पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात महर्षींचेच सनातनच्या आश्रमात आगमन झाले अन् साधकांना एक दैवी योग अनुभवायला मिळाला.