परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुकार्याविषयी असलेला कृतज्ञताभाव !

माझ्याकडून जे काही कार्य झाले, ते माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या आशीर्वादाने झाले. याची दोन उदाहरणे येथे दिली आहेत. अ. गुरूंनीच हे सर्व माझ्याकडून करवून घेतले आहे ! वेळोवेळी बाबा जे शिकवायचे, ते सर्व मी लिहून ठेवायचो. बाबा मला म्हणायचे, या लिखाणाचा तुम्हाला उपयोग नाही (कारण आता तुम्ही शब्दातीत माध्यमातून शिकू शकता); पण इतरांना होईल. मी अध्यात्मावर … Read more

विविध योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार जिवांकडून कलियुगात साधना करवून घेणारी गुरुमाऊली !

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे घडवले !

‘वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत प.पू. डॉक्टरांचे ३ – ४ अभ्यासवर्ग गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या वेळी मी (श्री. प्रकाश जोशी) आणि श्री. गुरुनाथ बोरकर यांनी त्याचे आयोजन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याची अनुभूती

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍यांना ते चैतन्य जाणवते.

शीघ्र गतीने अध्यात्मप्रसार होण्यास्तव प.पू. डॉक्टरांनी केलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची निर्मिती आणि त्यातून साधकांची साधना व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून दिलेली शिकवण !

दूरचित्रवाहिन्या आणि संगणकीय तंत्रज्ञान भारतात वेगाने येऊ लागले आहे, हे प.पू. डॉक्टरांच्या दृष्टोत्पत्तीस होतेच. या दृक्-श्राव्य माध्यमांचा जनमानसावरील पगडा वाढत होता. या माध्यमांद्वारे प्रसार केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला कोणतेही सूत्र आकलन होण्यास आणि मनाची पकड घेण्यास सोपे जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:तील शिवतत्त्वाची घेतलेली साक्ष म्हणजे त्यांना ऐकू आलेला नाद !

परात्पर गुरूंविषयी सांगायचे झाले, तर ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म हेच खरे वर्म’ असे वर्णन करू शकतो. आजच्या या आपत्काळात सगुण स्तरावर साधकांना आवश्यक मार्गदर्शन करणारे आणि निर्गुण स्तरावर सर्व करवून घेणारे दुसरे, अशी दोन वेगवेगळी तत्त्वे नसून ते एकच परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.

अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने दूर करण्यासाठी स्वतः स्वच्छता करणे

फोंडा आश्रमात असलेली अस्वच्छता, अव्यस्थितपणा यांमुळे तेथे अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे

ज्ञानेश्‍वरमाऊलींचे पसायदान आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महान कार्य यांतील साम्य दर्शवणारी सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरप्राप्ती करवून देणारे मोक्षगुरु, विपुल ग्रंथांद्वारे ज्ञान देणारे ज्ञानगुरु आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र पाहिजे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु, तर जगभरातील मानवाला मार्गदर्शन करणारे जगद्गुरु आहेत.

साधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते.

आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक !

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !