भोपाळ येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील धर्माभिमानी शिलेदार साधनापथावर अग्रेसर

rameshwar_mishra
प्रा. रामेश्‍वर मिश्र (डावीकडे) यांचा सत्कार करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
dinesh_MP
श्री. दिनेश एम्.पी.(उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव
vivek_bhave
अधिवक्ता विवेक भावे (उजवीकडे)यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव

विद्याधिराज सभागृह : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र (वय ७१ वर्षे) यांनी ६३ टक्के, तर मंगळुरू (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. (वय ३९ वर्षे) आणि कल्याण (मुंबई) येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे (वय ५२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या व्यासपिठावरून घोषित करण्यात आले. ही घोेषणा ऐकूण आज सकाळपासूनच ओसंडून वाहत असलेला हिंदु धर्माभिमान्यांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. भगवान श्रीकृष्णाने धर्माभिमान्यांना दिलेल्या या अमूल्य भेटीविषयी उपस्थित सर्वांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

सर्वप्रथम श्री. दिनेश एम्.पी., अधिवक्ता श्री. विवेक भावे यांना व्यासपिठावर आमंत्रित करून त्यांच्याकडे पाहून काय वाटते, याचा उपस्थितांना प्रयोग करण्यास सांगितले. या प्रयोगाला धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वरील धर्माभिन्यांनी आध्यात्मिक उन्नती केल्याची पावती दिली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या दोघांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. त्यानंतर पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी थोड्याच वेळात ज्येष्ठ तत्त्वचिंतक, लेखक आणि इतिहासकार प्रा. रामेश्‍वर मिश्र हेही ६३ टक्के पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याचे घोषित केले. एका पाठोपाठ एक आनंदवार्ता देऊन भगवान श्रीकृष्णाने अधिवेशनाच्या अंती सर्वांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आशीर्वाद दिला.

या वेळी श्री. दिनेश एम्.पी. आणि अधिवक्ता श्री. विवेक भावे यांचा सत्कार सनातन संस्थेचे प्र्रसारप्रमुख आणि सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून, तसेच भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा अन् भेटवस्तू देऊन करण्यात आला, तर प्रा. रामेश्‍वर मिश्र यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला.

 

मनोगत

सनातन परिवार हेच माझे घर आहे ! – श्री. दिनेश एम्.पी.

ईश्‍वराच्या कृपेनेच हिंदू अधिवेशनाच्या वैकुंठासारख्या पवित्र ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला. हे सर्व कर्तृत्व माझे नसून ईश्‍वराचे आहे. मी हिंदुस्थानात कुठेही गेलो, तरी सनातन परिवार हेच माझे घर आहे.

गुरूंचे कार्य घरोघरी पोचण्याची तळमळ असणारे
श्री. दिनेश एम्.पी. ! – श्री. रामानंद गौडा, प्रसारसेवक, सनातन संस्था, कर्नाटक

श्री. दिनेश एम्.पी. यांच्या सत्काराविषयी बोलतांना श्री. रामानंद गौडा म्हणाले, श्री. दिनेश यांची कपड्यांची तीन दुकाने आहेत. ते पुष्कळ श्रीमंत असूनही त्यांना त्याची आसक्ती नाही. गुरूंची सेवा कशी करू, याची त्यांना तळमळ आहे. त्यांच्या दुकानांमध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने ठेवण्यात आली आहेत. कपड्यांची विक्री झाली नाही, तरी चालेल; पण गुरूंचे साहित्य घरोघरी पोचले पाहिजे, असा त्यांचा भाव असतो. त्यांनी आतापर्यंत सनातन प्रभातचे ३०० वर्गणीदार केले आहेत.

राष्ट्र आणि धर्म जागृतीचे माझे कार्य चालूच राहील ! – अधिवक्ता श्री. विवेक भावे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच हे सर्व झाले. मी माझी सेवा त्यांना अर्पण करतो. यापुढेही राष्ट्र आणि धर्म जागृतीचे माझे कार्य चालूच राहील.

अधिवक्ता श्री. भावे स्वत:हून साधनेविषयी जाणून घेतात ! – श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

अधिवक्ता श्री. भावे यांच्याविषयी सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्हणाले, अधिवक्ता भावे अतिशय नम्र आहेत. प.पू. गुरुदेव यांच्याप्रती त्यांचा भाव आहे. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन कसे करावे, यासाठी स्वत: साधकांकडे जाऊन शंकानिरसन करून घेतात.

प्रा. मिश्र एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व ! – श्रीमती कुसुमलता केडिया

प्रा. मिश्र यांच्याविषयी माहिती देतांना श्रीमती कुसुमलात केडिया म्हणाल्या, जेव्हा माझा श्री. मिश्र यांच्याशी संपर्क आला, तेव्हा मला अनेक वेळा स्वप्ने पडली. या स्वप्नांमध्ये मला एक तपोवन आहे, तेथे वृक्ष आहेत, तसेच तेथे एक कुटी असून त्या ठिकाणी एक दाढीवाले ऋषि मार्गर्शन करत आहेत, असे दिसले होते. त्याचप्रमाणे एका संतांनीही प्रारंभी प्रा. मिश्र एक ऋषि असल्याचे म्हटले होते. ते ५ वर्षांचे असतांना त्यांना रामचरितमानस आणि गीता कंठस्थ होती. १६ व्या वर्षी वेद, उपनिषदे यांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांना सर्वच विषयांचे ज्ञान आहे. प्राचीन भाषांपासून ते आजपर्यंतचे हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांमधील साहित्य, भारतीय दर्शन, युरोपीय दर्शन, इतिहास, समाजशास्त्र आणि राजकारण यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांना भारतीय संस्कृती, तसेच युरोपीय संस्कृती यांचे ज्ञान आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात