परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आदर्श जीवन पद्धती !

PP_Dr_2012_nirgun_C_18july2014
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात. देवच साधकांना अनुभूती देतो, अशा प्रकारचे काहीतरी साधकांना सांगत. मागील वर्षी मात्र महर्षींची आज्ञा म्हणून त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यास साधकांना अनुमती दिली आणि साधकांनी महर्षींनी सांगितलेले प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व जगाला सनातन प्रभातच्या माध्यमातून सांगितले. यात कुठेही प.पू. डॉक्टरांचा स्वतःचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. महर्षि सांगतील त्याप्रमाणे त्यांचे आज्ञापालन करावे, इतकेच होते, तरीही काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांना आणि अपेक्षेप्रमाणे पुरो(अधो)गाम्यांना पोटशूळ उठलाच ! काहींनी तर दूरचित्रवाहिन्यांवरून त्यांना भेटण्याची आणि त्यांचे चमत्कार पहाण्याची (जे प.पू. डॉक्टर कधीही करत नाहीत) आग्रही इच्छा व्यक्त केली.

Yogesh_Jaltare
अधिवक्ता योगेश जलतारे

असो. ही पार्श्‍वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे प.पू. डॉक्टरांचे अलौकिकत्व शब्दांत वर्णन करता येण्यापलीकडे आहे, असे महर्षि सांगतात आणि साधकांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेही आहे. त्यामुळे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, हिंदुत्ववादी किंवा पुरोगामी यांना काय वाटते, याला महत्त्व नाही. जे खरे हिंदुत्वनिष्ठ आहेत, ते प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आध्यात्मिक वाटचाल करत आहेत. मी स्वतः गेली १६ वर्षे प.पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात साधना करत आहे. या कालावधीत त्यांच्या संदर्भात अनेक अनुभूती मीही घेतल्या आहेत. त्यातही काही अनुभव असे आहेत की, बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यासंदर्भात जरी प.पू. डॉक्टरांशी स्वतःची तुलना केली, तरी ते नभसूर्याशी तुलना करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या लक्षात येईल आणि काहींना उपरती झालीच, तर ते प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व विनाविकल्प मान्य करतील, यात शंका नाही. ज्यांना हेे शक्य होणार नाही, त्यांनी स्वतःविषयी इतरांना एकतरी तसा अनुभव आला आहे का, याचा अंतर्मुखतेने विचार करावा. अर्थात हा लेखप्रपंच त्यांच्यासाठी नव्हे, तर जे साधक अद्याप प.पू. डॉक्टरांना भेटले नाहीत; परंतु त्यांचे अलौकिकत्व अनुभवत आहेत, त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून आहे.

 

१. प.पू. डॉक्टरांचे बुद्धीगम्य व्यक्तीगत जीवन

अ. आश्रमात शेकडो साधक असतांना आणि प.पू. डॉक्टरांचा प्रत्येक शब्द झेलण्यास ते सिद्ध असतांना प.पू. डॉक्टर कधीही कुठल्याही साधकाला स्वतःची कामे सांगत नाहीत. ते स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात. अगदी रुग्णाईत अवस्थेत सतत तोल जात असतांनाही ते स्वतःच स्वतःचे सर्व करतात.

आ. साधकांना राजयोग्याप्रमाणे सुखसुविधा देणारे प.पू. डॉक्टर स्वतः मात्र संन्यस्त जीवन जगतात. त्यांच्या खोलीत एक साधी आसंदी, एक छोटे पटल (जे ते जेवणासाठीही वापरतात) आणि झोपण्यासाठी एक छोटा पलंग आहे. त्यावरील गादीही साधीच आहे.

इ. प.पू. डॉक्टरांचे जेवण अत्यल्प आहे. त्यांना कुठलाही विशेष पदार्थ लागत नाही. सर्व जेवण पथ्याचे आणि अळणी असते.

ई. प.पू. डॉक्टर कपड्यांचे मोजकेच जोड वापरतात. ते फाटल्यास शिवून पुन्हा वापरतात. हाच भाग त्यांचा पलंगपोस आणि उशीचा अभ्रा यांविषयीही आहे.

उ. दाढीसाठी ते अंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे वापरतात.

ऊ. त्यांच्या खोलीतील लादी पुसण्याचे कापड फाटल्यास तेही शिवूनच वापरले जाते. जुने फाटले; म्हणून लगेच दुसरे कापड घेतले, असे होत नाही. अशी काटकसर ते प्रत्येकच गोष्टीत करतात. याची अनेक उदाहरणे आहेत.

ए. सूक्ष्मातील त्रासामुळे त्यांना उकाड्याचा पुष्कळ त्रास होतो, तरीही ते स्वतः वातानुकूलन यंत्र वापरत नाहीत.

ऐ. ते केवळ सर्व साधकांनाच सतत सत्सेवेत रहायला सांगतात असे नाही, तर स्वतःही सतत ग्रंथलिखाणाची सेवा करतात. ते रुग्णाईत असले किंवा थकवा असला, तरी यात कधीच खंड पडत नाही.

ओ. इतकी मोठी संस्था उभारून आणि तिचे कार्य इतके विस्तारले असतांनाही ते आश्रमात एका साध्या शिष्याप्रमाणे जीवन व्यतित करतात आणि म्हणतातही, मी गुरूंच्या आश्रमात शिष्य म्हणून रहातो.

औ. संस्था आणि साधक यांवर अनेक संकटे आली. अगदी कारागृहात जाण्याची वेळ आली, तरी प.पू. डॉक्टर जराही विचलित होत नाहीत. त्यांच्या आनंदावस्थेत काहीही अंतर पडत नाही. ते स्वतःही स्थिर अन् आनंदी असतात आणि साधकांनाही ठेवू शकतात.

 

२. प.पू. डॉक्टरांचे बुद्धीगम्य समष्टी जीवन (इतरांशी वागणे-बोलणे)

अ. जो प.पू. डॉक्टरांना एकदा भेटतो, तो कायमचा त्यांचा होतो.

आ. अहंकार साधनेला घातक आहे, हे त्यांना ठाऊक असूनही तीव्र अहंकार असलेल्या साधकांशीही ते तितक्याच प्रेमाने बोलतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही दुजाभाव असत नाही किंवा ते समोरच्याला न्यून लेखत नाहीत.

इ. प.पू. डॉक्टर लहानात लहान आणि वयोवृद्ध व्यक्तींशीही तितक्याच समरसतेने संवाद साधतात.

ई. कोणी कितीही गरीब असो, श्रीमंत असो, सुदृढ असो वा रोगग्रस्त असो किंवा कुठल्याही जातीचा असो, ते साधकांशी मोकळेपणाने आणि अत्यंत प्रेमाने संवाद साधतात. त्वचारोगामुळे जर्जर झालेला विदेशातील एक साधक आपल्या आजारामुळे इतरांना किळस वाटू नये, यासाठी पूर्ण शरीर झाकून ठेवायचा. त्याला प.पू. डॉक्टरांसमोर जायला संकोच वाटत असतांना प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला पायांतील मोजे काढायला लावून त्याच्या व्याधीचे स्वरूप पाहिले. त्यांच्या या प्रेमामुळे त्या साधकामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.

उ. मोठे संमोहनउपचारतज्ञ असूनही कोणी मनाच्या संदर्भातील प्राथमिक गोष्ट जरी सांगितली, तरी मला शिकायला मिळाले, असे ते सांगतात. उच्च कोटीचे संत असूनही कोणी अध्यात्मातील प्राथमिक भाग जरी सांगितला, तरी ते पूर्ण मनापासून ऐकतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही मला हे ठाऊक होते, असे नसते.

ऊ. श्रीरामाने लक्ष्मणाला रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याच्याकडूनही राजधर्म शिकायला सांगितला, तसे प.पू. डॉक्टर साधकांना सर्वांकडूनच शिकायला सांगतात.

ए. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाकणे कठीण असतांनाही ते सर्वच संतांना शक्यतो वाकून नमस्कार करतात.

ऐ. प.पू. डॉक्टरांना आधी कधीच पाहिलेले नसतांना शेकडो हिंदुत्ववादी, त्यांचे नेते विविध संप्रदायांचे प्रमुख आदी सर्वच जण त्यांचे श्रेष्ठत्व एका भेटीतच अनुभवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनुसार मार्गक्रमण करतात.

ओ. प.पू. डॉक्टरांनी आपल्यातील प्रेमाने आणि लीनतेने भारतभरातील अनेक संतांना सनातनशी जोडले. त्यांच्या आशीर्वादामुळे आज सनातनचे कार्य झपाट्याने वाढत आहे.

 

३. प.पू. डॉक्टरांचे बुद्धीगम्य कार्य

अ. प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केल्यावर अल्पावधीतच सहस्रो साधक संस्थेशी जोडले गेले. हे साधक आता प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घेत आहेत. या साधकांपैकी ६५ साधक संतपदी पोहोचले असून ८८० हून अधिक साधकांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठला आहे.

आ. हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाल्यावर भारतभरचे हिंदुत्ववादी समितीशी जोडले गेले. त्यातून संपूर्ण देशात हिंदु संघटनाचे व्यापक कार्य चालू आहे. समितीने राबवलेल्या अधिवेशने, राष्ट्रीय हिंदू आंदोलन इत्यादी उपक्रमांमुळे समितीने अल्पावधीतच हिंदूंच्या मनात घर केले आहे. आज अनेक हिंदुत्ववाद्यांना समितीचा आधार वाटतो. यांतील अनेक हिंदुत्ववाद्यांनीही प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली आहे.

इ. प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेल्या ग्रंथांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातून जगभरात अध्यात्मप्रसार होत आहे.

ई. विदेशातील स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन ही संस्था अध्यात्मसंबंधी शंका आणि मार्गदर्शन यांसाठी सनातनच्या ग्रंथांचाच संदर्भ घेते. या संस्थेचे साधकही अध्यात्मात विहंगम प्रगती करत आहेत.

उ. प.पू. डॉक्टरांची अध्यात्मशास्त्रावर १०० प्रतिशत श्रद्धा असतांना ते त्यातील प्रत्येक गोष्टीचे बारकाईने संशोधन करतात. संशोधनाअंती बुद्धीने निष्कर्ष काढून समष्टीला ते त्यांच्या बौद्धिक स्तरावर येऊन समजावून सांगतात. अध्यात्मशास्त्र बुद्धीने समजावून सांगणारे प.पू. डॉक्टरांसारखे संत विरळाच !

ऊ. बुद्धीवादी, पुरोगामी, तथाकथित समाजसेवक इत्यादी सर्वजण स्त्री-मुक्ती, जातीनिर्मूलन इत्यादींच्या नुसत्या गप्पा ठोकतात; परंतु व्यक्तीगत जीवनात ते प्रत्यक्षात किती आचरणात आणतात, हा प्रश्‍नच आहे. प.पू. डॉक्टरांनी मात्र या गोष्टी आपल्या व्यक्तीगत जीवनातच नव्हे, तर समष्टी जीवनातही स्वतः राबवून दाखवल्या आहेत. आज सनातनचे कार्य असलेल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत अधिकांशतः साधिकाच साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. ब्राह्मण किंवा अन्य उच्च जातीतील नसलेले साधक-साधिका दायित्वाच्या सेवा पहातात. याची सूचीही सनातनने वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे.

प.पू. डॉक्टर आणि त्यांचे कार्य या संदर्भातील ही काही प्रातिनिधिक व्यष्टी-समष्टी उदाहरणे आहेत. यातून त्यांचे श्रेष्ठत्व बुद्धीनेही अभ्यासता येते; म्हणूनच लेखाच्या मथळ्यात बुद्धीगम्य श्रेष्ठत्व असा उल्लेख केला आहे. प.पू. डॉक्टरांची बुद्धीअगम्य वैशिष्ट्ये लिहावयाची झाल्यास कागद आणि लेखणी अपुरी पडेल !

प.पू. डॉक्टरांच्या केलेल्या या गुणसंकीर्तनातून आम्हा साधकांचा भक्तीभाव वाढू दे, तसेच त्यांच्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याची बुद्धी आणि शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी, हीच त्या गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना !

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०१६) 

 

४. देवघराच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली अन्य काही सूत्रे

अ. चैतन्य-निर्मितीचा दृष्टीकोन

परात्पर गुरु डॉक्टरांनी देवघरात मूर्ती आणि चित्र यांच्या खाली एका पांढर्‍या रंगाचे कापड घालण्यास सांगितले होते. तसे केल्यावर देवघरातून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. यातून त्यांचा ‘काय केले की, अजून चैतन्य निर्माण होईल’, हा दृष्टीकोन लक्षात येतो.

आ. भावजागृतीचा दृष्टीकोन

देवघरातील देवतेच्या प्रत्येक छोट्या मूर्तीला एक छोटे आसन आहे. छोट्या आसनावरील मूर्तीकडे पाहून भाव जागृत होतो. देवपूजनाचा मुख्य उद्देश भावजागृती असल्याने त्यादृष्टीने केलेली छोटीशी कृतीही भावजागृतीसाठी कशी उपयुक्त ठरते, हे शिकायला मिळाले.

इ. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा

देवापुढे दिवा लावल्यानंतर दिव्याची काजळी बाहेर पडून ताटलीच्या वरील देवघराचा भाग काळा व्हायला नको; म्हणून देवघरात ठेवलेल्या ताटलीच्या वरील बाजूस प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. यातून परात्पर गुरु डॉक्टरांमधील व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण लक्षात येतात.

ई. काटकसरीपणा

परात्पर गुरु डॉक्टर देवासमोर लावण्यासाठी विक्रीसाठी उपयुक्त नसलेल्या, तसेच मध्ये तुटलेल्या उदबत्त्या वापरतात. यातून परात्पर गुरु डॉक्टरांचा काटकसरीपणा हा गुण दिसून येतो.

उ. विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक कृती करणे

परात्पर गुरु डॉक्टर उदबत्ती पेटवण्यासाठी काड्यापेटीतील काडीचा वापर केल्यावर, ती लगेच केराच्या बादलीत टाकत नाहीत; कारण ती गरम असल्याने तशीच बालदीत टाकल्यास बालदीतील कागद जळू शकतात. त्यामुळे ती काडी ते आधी एका पत्र्याच्या लहान तुकड्यावर ठेवतात आणि थोड्या वेळाने ती काडी केराच्या बादलीत टाकतात.

– कु. प्रियांका विजय लोटलीकर, गोवा. (२२.६.२०१९)