धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे शासनकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्म शब्दाचा अर्थ

‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव यांच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात आणि व्यष्टी साधनेसाठी जीवन समर्पित करू शकतात. आता काळानुसार समष्टी साधना, म्हणजे हिंदु … Read more

शोकांतिका !

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाइम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

‘आपली वैदिक संस्कृती अत्यंत महान आहे. संस्कृती सोडणे म्हणजे हाताला लागलेला धनसंपत्तीचा साठा सोडण्यासारखेच आहे. वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल. वैदिक आर्य संस्कृती ही परमेश्‍वराकडून आलेली अनादी, अच्युत आणि अतिशुद्ध असून ती अनादि मानवी संस्कृतीपासून चालत आली आहे.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ … Read more

हिंदु संस्कृती

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही. सांप्रत आपणा सर्वांना आपाद्मस्तक राजसभाव अंगी बाणलेला आदर्श नेता हवा आहे, ज्याच्या नसानसांमधून प्रचंड चैतन्य ओसंडत आहे. असा युवक नेता हवा आहे, ज्याच्या अंगी रणांगणावरील योद्ध्याचा आदेश भरून राहिला आहे. आयुष्याच्या रणभूमीवर सध्या आपणांस लढाऊ, शूर … Read more

देव सर्वत्र आहे

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’

विजयादशमीनिमित्त संदेश

विजयादशमीपासून हिंदु समाज आणि देशहित यांच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा ! ‘वर्ष २०२१ ते २०२३ हा जागतिक महायुद्धाचा काळ असणार आहे. या काळात भारतीय सैन्यालाही सीमोल्लंघन करावे लागणार आहे. भारतीय सीमेवर युद्ध चालू झाल्यानंतर शत्रूराष्ट्रांचे हस्तक असणारे देशांतर्गत शत्रू अराजकता निर्माण करण्यासाठी गृहयुद्ध भडकवू शकतात. तसेच देशाच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या या काळात पूर, भूकंप, युद्ध इत्यादींमुळे … Read more