पोलीसखाते आणि प्रशासन यांची झालेली दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आता केवळ रामराज्य हवे !

‘भारतातील लोकशाहीचा स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षांचा इतिहास पहाता ‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी कोणत्याही भ्रष्ट आणि दुराचारी राजकीय पक्षाचे राज्य नको, तर केवळ रामराज्य हवे’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुकीसाठी उभे रहाणा-या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणूक लढवण्याचे खरे कारण !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कोणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान आणि पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या -हासास कारणीभूत !

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी ! एका अर्थाने भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी भारतीय जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तिस-या महायुद्धात देव कोणाला वाचवणार ?

‘जे हिंदु राष्ट्रात रहाण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांना आगामी तिसर्‍या महायुद्धात देवच वाचवणार आहे. त्यांची काळजी करू नका !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.८.२०२१)