खरा आनंद

आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडीत नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडीत असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. … Read more

कर्तव्य

आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

श्रद्धेचे महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन