अमरावती येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनाविषयक प्रवचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ५ ठिकाणी ‘साधना’ या विषयावर विषयक प्रवचने घेण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेली टक्केवारी आणि उपकरणांद्वारे केलेले परीक्षण यांत साम्य असणे, ही त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती !

वर्ष २००० पूर्वी साधक-चित्रकारांनी संगणकाद्वारे श्री गणपतीचे चित्र काढण्यास आरंभ केला आणि त्यांनी वर्ष २०१२ पर्यंत श्री गणपतीची एकूण ६ चित्रे प्रकाशित केली. प्रथम प्रकाशित केलेल्या चित्रात गणपतितत्त्व ४ टक्के आले असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितले.

सनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शन कक्षास पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांची भेट !

पाचोरा येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २३ मार्च या दिवशी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे आणि ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हे शंकराचार्य अन् सर्व संत-महंत यांचे कार्य करत आहेत ! – महंत परमहंसदास महाराज

भगवान श्रीराम यांनी सत्तेचा त्याग करून रामराज्याची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षाने सत्ता पणाला लावून भारताला वाचवण्यासाठी त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे, असे प्रतिपादन अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंसदास महाराज यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्थेचे प्रदर्शन उत्कृष्ट आहे ! – योगी शैलन्द्रनाथ, गोरखपूर, उत्तरप्रदेश

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे. या प्रदर्शनातील ‘ढोंगी बुवा बाजी’संबंधी ग्रंथ मला पुष्कळ आवडला, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील योगी शैलन्द्रनाथ यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातनचे ग्रंथप्रदर्शनातील कार्य आमच्यासारख्या लोकांनी यापूर्वीच चालू करायला हवे होते ! – महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज, वृंदावन, उत्तरप्रदेश

सनातनचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले. आमच्यासारख्या लोकांनी हे कार्य यापूर्वीच चालू करायला हवे होते. तुम्ही हे कार्य केले, ते पुष्कळ चांगले झाले. आम्ही तन, मन आणि धन यांनी तुमच्यासमवेत आहोत. या कार्याला अधिकाधिक पुढे नेले पाहिजे.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे ! – स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या

सर्व नागरिक आणि मुले यांना आध्यात्मिक ग्रंथांची माहिती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय शिक्षणप्रद अन् बोधप्रद आहे. हे प्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे अवश्य लावले पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामरसिकदास महाराज यांनी काढले.

काश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – चेतन राजहंस

वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा अथवा मृत्यूला सामोरे जा’, असा होतो.

मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

 धर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले.