Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शन कक्षास पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांची भेट !

ग्रंथप्रदर्शन कक्षास भेट देतांना आमदार श्री. किशोर पाटील (मध्यभागी)

जळगाव, २४ मार्च – पाचोरा येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २३ मार्च या दिवशी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे आणि ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

या वेळी श्री. किशोर पाटील म्हणाले, ‘‘लव्ह जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा.’’ धर्मशिक्षणावर आधारित ग्रंथ पाहून त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या २०० ग्रंथांची मागणी केली. महाविद्यालयीन तरुणींपर्यंत हा विषय पोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी ‘आशिर्वाद इन्फ्रा’चे मुकुंदजी बिल्दीकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषदेचे सदस्य रावसाहेब पाटील, पदमबापु पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी अजयकुमार जैस्वाल आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात