सनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता

१७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धूलिवंदन आणि
रंगपंचमी या उत्सवांच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती

पुणे, २५ मार्च – हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

१७ वर्षांपासूनचे अथक प्रयत्न आणि प्रबोधन यांमुळे धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांमधील अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी हिंदू जागृत झाल्याचे दिसून आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंगाने माखलेल्यांना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध केल्याने जलाशयाचे संभाव्य प्रदूषण रोखले गेले. जलदेवतेचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले. या अभियानात खडकवासल्यातील ग्रामस्थ, ‘कमिन्स इंडिया’ या आस्थापनाचे ६० हून अधिक कर्मचारी, सनातन संस्था, तसेच रणरागिणी शाखा यांचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment