सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हे शंकराचार्य अन् सर्व संत-महंत यांचे कार्य करत आहेत ! – महंत परमहंसदास महाराज

महंत परमहंसदास महाराज यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – भगवान श्रीराम यांनी सत्तेचा त्याग करून रामराज्याची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षाने सत्ता पणाला लावून भारताला वाचवण्यासाठी त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे, असे प्रतिपादन अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंसदास महाराज यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु

(डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ‘देवनदी गंगाकी रक्षा करें !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ देऊन सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते.

महंत परमहंसदास महाराज पुढे म्हणाले की, सनातन संस्कृतीला जागतिक स्तरावर स्थापित करण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. ही माझी सर्वांना प्रार्थना असून सत्ताधारी पक्षाला हा आदेश आहे. जर सत्ताधार्‍यांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले नाही, तर ते त्यांच्या लक्ष्यापासून भटकले आहेत, असे समजले जाईल. जो कोणी नेता किंवा पंतप्रधान यासाठी पुढे येईल, तोच भारतीय संस्कृतीचा खरा रक्षक असेल. तोच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करू शकेल. त्यांचीच देशाला आवश्यकता आहे. सत्तेचा हव्यास असणार्‍यांची आता भारताला आवश्यकता नाही. जोपर्यंत भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित होत नाही, तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे हनन रोखणे अशक्य आहे. अन्य धर्मीय भारतात जेवढे सुरक्षित आहेत, तेवढे इतर कोणत्याही देशात ते सुरक्षित नाहीत. नेपाळ ‘हिंदु राष्ट्र’ होते; मात्र तेही आता हिंदु राष्ट्र म्हणून राहिले नाही. त्यामुळे आता जगात एकही हिंदु राष्ट्र्र नसल्याने सध्याच्या सरकारने तात्काळ भारताला ‘हिंंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे. हिंदु राष्ट्र घोषित झाले, तर संपूर्ण विश्‍वाचे कल्याण होणार आहे. इतर देशात आणि भारतात असलेल्या अन्य धर्मियांना तेेथे अन् येथे किती मानसन्मान मिळतो, हे त्यांनी पहावे. त्यावरून त्यांना कळेल की, सनातन धर्म आणि इतर धर्म यात किती भेद आहेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हे शंकराचार्य
अन् सर्व संत-महंत यांचे कार्य करत आहेत ! – महंत परमहंसदास महाराज

‘जे कार्य शंकराचार्य, सर्व संत-महंत आणि भारतातील प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे, ते काम सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती करत आहेत; परंतु लोकांचे मूळ गोष्टीकडे लक्ष नाही.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment