भावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना शिबिरांचे आयोजन

तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला.

आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग

मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य, कपडे, संसारोपयोगी आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर

बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात आले.

साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी

बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक औषधे

बेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना भोजन अन् वैद्यकीय साहाय्य !

सनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी तपासणी करून औषधे देण्यात आली.