सनातनचे ग्रंथप्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे लावले पाहिजे ! – स्वामी रामरसिकदास महाराज, अयोध्या

डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी चर्चा करतांना स्वामी रामरसिकदास महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – सर्व नागरिक आणि मुले यांना आध्यात्मिक ग्रंथांची माहिती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय शिक्षणप्रद अन् बोधप्रद आहे. हे प्रदर्शन शाळा आणि महाविद्यालये येथे अवश्य लावले पाहिजे. याशिवाय प्रत्येक शहरातील पुरुष आणि महिला सत्संगाच्या मंडळात या प्रदर्शनातील आध्यात्मिक माहितीचा प्रसार केला पाहिजे. हिंदु धर्माची माहिती शाळा आणि महाविद्यालये येथे शिकवली जात नाही. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या आध्यात्मिक संस्थांप्रमाणे इतर संस्थांनी हिंदु धर्मातील ग्रंथांची माहिती देऊन अध्यात्मप्रसार करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अयोध्या येथील ऋणमोचन घाटावरील सुखरामदास रामायणी कंचन भवन मंदिराचे स्वामी रामरसिकदास महाराज यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे काढले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी स्वामी रामरसिकदास महाराज यांचा सन्मान केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment