सनातन संस्थेचे प्रदर्शन उत्कृष्ट आहे ! – योगी शैलन्द्रनाथ, गोरखपूर, उत्तरप्रदेश

१. योगी शैलन्द्रनाथ आणि २. पू. नयनाभीरामदासजी महाराज यांना प्रदर्शनाची माहिती देतांना श्री. श्रीराम काणे

प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे. या प्रदर्शनातील ‘ढोंगी बुवा बाजी’संबंधी ग्रंथ मला पुष्कळ आवडला, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील योगी शैलन्द्रनाथ यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत वृंदावन येथील पू. नयनाभीरामदासजी महाराजही उपस्थित होते.

सनातनचे साधक श्री. श्रीराम काणे यांनी या दोघांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पू. नयनाभीरामदासजी महाराज यांचा सन्मान करून त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘देवनदी गंगाकी रक्षा करे !’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला. पू. नयनाभीरामदासजी महाराज म्हणाले, ‘‘देशातील संस्कृती आणि मानवता यांच्या उत्थानासाठी या प्रदर्शनातून सनातनने चांगले प्रयत्न केले आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment