सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ ऑगस्ट या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला.

भारताला पुन्हा आध्यात्मिक देश बनवण्याचे आपले एकच लक्ष्य ! – बाबा उमाकांतजी महाराज

उमाकांतजी महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला असून बाबा जयगुरुदेवजी महाराज हे त्यांचे गुरु होत. वर्ष २००७ पासून गुरूंच्या आज्ञेने बाबा उमाकांतजी महाराज धर्मस्थापना आणि लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यांसाठी कार्य करू लागले.

पुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह पाक्षिक सांस्कृतिक वार्ताच्या व्यवस्थापिका सौ. सुनिता पेंढारकर आणि कर्मचारी होते.

सनातन संस्थेचे साधक आणि आम्ही एकच आहोत ! – डॉ. कौशिक मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा

सनातन संस्थेला भेटण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते की, अशीही एक संस्था आहे जी धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे संत भारतभूवर असतील, तोपर्यंत अनिष्ट शक्ती आपला देश आणि धर्म यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत !

मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’

हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे – श्री. भास्करराव पाटील खतगावकर, भाजप

महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान नेते श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांनी २६ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आगमन

महर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री. आदर्श बालाजी (वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांची मुलगी सौ. अभिरामी यांचा मुलगा) यांचे १४ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी महाराज यांची पनवेल येथे सदिच्छा भेट !

सनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत आहे.

श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.

सनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था ! – योगी अरविंद, ऋषिकेश

सनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे. वैदिक सनातन संस्कृतीची जपणूक करणार्‍या या संस्थेचे समाजात अत्यंत मानाचे स्थान आहे. संस्थेच्या कार्यास माझ्या शुभेच्छा ! – योगी अरविंद, ऋषिकेश