उप्पळा (केरळम्‌) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमात दैवी, चैतन्यदायी अनुभूती आली. आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. आश्रमातील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे.’’

सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी

…सनातन धर्माचे खरे योद्धा डॉ. आठवले आहेत. सनातनच्या आश्रमात मी जी अद्भूत अनुभूती घेतली, तशी अनुभूती मी जीवनात कधीच घेतली नाही. येथे कुठेच दिखावा नाही, हे एक नैसर्गिक वास्तव आहे, असे आशीर्वचन ‘नॅशनल सोसायटी फॉर हरे कृष्णा कॉन्सिअसनेस’ (नॅशकॉन) चे व्यवस्थापकीय अध्यक्ष श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी यांनी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर दिले.

भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक आणि कैलास मठाच्या प्रतिनिधी स्वामिनी उन्मेष भारती यांनी २४ एप्रिल या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या बेंगळुरूच्या श्री राजराजेश्वरी मंदिर येथील रहिवासी आहेत.

वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदासजी महाराज, प्रकाश दासजी महाराज आणि प्रकाश नारायणजी महाराज यांनी येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

स्वामीजी म्हणाले, ‘‘मी सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो आहे. येथे मला सेवाभाव, अहंकाररहित जीवन यांचे दर्शन घडले. या आश्रमात मला अनेकात एकतेचे दर्शन झाले…

‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !

वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.

नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट

सनातनचा आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी यांनी सांगितले की, सनातन आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. आश्रमात सात्त्विकता आणि शांतता अनुभवायला मिळाली. साधकांची साधना आणि सेवा विशेष आहे. असे आश्रम प्रत्येक जिल्ह्यात असायला हवेत.

पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

अष्टांग योग परिवार, हिंदुस्थान’चे संस्थापक तथा विश्व हिंदु परिषदेच्या पुणे महानगराचे धर्माचार्य प्रमुख अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज)

तुम्ही जे हिंदु राष्ट्राचे कार्य करत आहात, ती काळाची आवश्यकता असून त्याला यश प्राप्त होईल. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता असून यापुढील काळात हे कार्य वृद्धींगत होईल.