हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे – श्री. भास्करराव पाटील खतगावकर, भाजप

रामनाथी (गोवा) : महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान नेते श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांनी २६ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

आश्रम पाहून मनाला आनंद आणि समाधान मिळाले ! – भास्करराव पाटील खतगावकर

डावीकडून सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना

आश्रम पाहून मनाला आनंद आणि समाधान मिळाले. भारत हे हिंदु प्रधान राष्ट्र आहे. या हिंदु प्रधान राष्ट्रात हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे. कार्य करत असतांना काही संघटना सहकार्य न करता विरोध करत आहेत, हे या देशाचे दुर्दैव आहे. हे महान कार्य करण्यार्‍या सर्व संतांना प्रणाम ! एकविसाव्या शतकात हिंदू आपल्या संस्कृतीला विसरल्यामुळे ते असमाधानी जीवन जगत आहेत. हिंदूंनी हिंदु धर्म समजून घेतला, तर त्यांच्या जीवनात आनंद आणि समाधान मिळेल, अशी प्रतिक्रिया भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment